नारायण राणेंच्या अडचणीत पुन्हा वाढ; BMCनं दिला ‘हा’ मोठा दणका

मुंबई | कोकणाची माती ही सर्व गोष्टींनी समृद्ध मानली जाते. कोकणातील निसर्गरम्य पर्यटनाच्या प्रेमात सर्वजण आपोआप पडतात. असं असताना कोकणचं राजकारण देखील तितकंच प्रसिद्ध आहे.

कोकणातील राजकारणात सर्वात जास्त वाद हा शिवसेना आणि राणे कुटुंबात असल्याचं राज्यानं वेळोवेळी पाहिलं आहे. अशातच आता हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुंबईतील अधिश बंगल्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. मुंबई महापालिकेनं राणेंना अजून एक नोटीस पाठवली आहे.

अधिश बंगल्याच्या बांधकामात सरकारी नियम मोडण्यात आल्याची तक्रार पालिकेला प्राप्त झाली आहे. परिणामी हा वाद वाढला आहे.

मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पथकासह राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा अशी नोटीस देखील बजावली होती.

आता पालिकेनं पंधरा दिवसांमध्ये उत्तर देण्याची नोटीस असतानाच दुसरी नोटीस बजावली आहे. परिणामी राणेंच्या बंगल्यावर पालिका कारवाई करण्याची शक्यता आहे.

नारायण राणेंना आपल्या बंगल्यात केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पालिकेनं 15 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. नारायण राणे या प्रकरणात न्यायालयात जाण्याचा मार्ग अवलंबण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संतोष दौंडकर नावाच्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी पालिकेला नारायण राणेंच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झालं असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळतील इतके लाख रूपये

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर” 

“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…”