पुणे | तळोजा कारागृहातून सुटका केल्यानंतर कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणेची त्याच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करत तळोजा ते पुण्यापर्यंत मिरवणूक काढली होती. त्यानंतर पुन्हा गजा मारणेला अटक करण्यात आली होती.
अशातच आता गजा मारणेचा मुलगा प्रथमेश मारणे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 22 वर्षीय बलात्कार केल्याचा गंभीर आरोप प्रथमेश मारणेवर आहे.
पिडीत तरूणीने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. प्रशमेश मारणे पिडीत तरूणीला आधीपासून ओळखत होता. पिडित तरूणी महाविद्यालयात शिकायला होती.
प्रथमेशने तिला खडकवासल्याला फिरण्यासाठी नेलं आणि नंतर एका लाॅजवर बळजबरीने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्याचबरोबर तिचे अश्लिल व्हिडीओ देखील शूट केले.
28 ऑगस्ट ते 17 मार्चपर्यंत हा प्रकार सुरू होता. ज्यावेळी तरूणीला अश्लिल व्हिडीओबद्दल समजलं त्यावेळी तिने व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती केली. त्याचबरोबर पोलिसात तक्रार देईल, अशी धमकी देखील दिली.
मात्र, प्रथमेशने तिचं न ऐकता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर अखेर कंटाळून तरूणीने पोलीसांकडे तक्रार दिली.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“बाळासाहेबांचा ‘तो’ नियम पाळून उद्धव ठाकरे राजीनामा देणार का?”
Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”
Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा
चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण
Narayan Rane: “आगे आगे देखिए होता है क्या!”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र