आता अभिनेता अमित साधसुद्धा सुशांतवर बोलला; ‘त्या’ विमान प्रवासाची आठवण काढत म्हणाला…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूला जवळपास पाच महिने उलटून गेले तरी देखील सुशांतचे चाहते सुशांतला विसरलेले नाहीत. सुशांतच्या आठवणी प्रत्येकाच्याच मनात अजूनही घर करून आहेत. सुशांत प्रकारणानंतर अनेक बड्या कलाकारांनी सुशांतच्या मृ.त्यूचा शोक व्यक्त केला होता. अशातच आता पुन्हा एकदा अभिनेता अमित साध याने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

विमान प्रवास करत असताना अमित बरोबर एक योगायोग घडला. यामुळे अमितच्या जीवाला सुशांतची आठवण चटका लावून गेली.

अमित साध चित्रपटाच्या शूटिंगसाठी कुल्लूला गेला होता. तो चित्रीकरण आटपून कुल्लूहून मनालीला विमानाने येत होता. यावेळी त्याच्या विमान तिकिटाचा क्रमांक ‘एसएसआर’ या शब्दांनी सुरू झाला होता. हा क्रमांक पाहिल्यानंतर अमितला सुशांतची आठवण आली असल्याचं त्याने म्हटलं आहे.

कुल्लूतून मुंबईकडे येताना माझ्या तिकिटावरील नंबर ‘एसएसआर’ने सुरू होत होता. सुरुवातीला मला हे समजलं नाही. मात्र, नंतर मला समजलं की हा असा नंबर फक्त मलाच मिळाला आहे, असं अमित साधने म्हटलं आहे.

तसेच मला वाटतं की कोरोना व्हायरसचा प्रभावानंतर चित्रपट सृष्टीत मोठा बदल झाला आहे. सुशांतच्या मृ.त्युनंतर चित्रपट सृष्टीवरही परिणाम झाला आहे. मला असंही वाटतं की याचा परिणाम आपल्या प्रत्येकावर झाला आहे. जर आपल्यावर याचा परिणाम झाला नसेल तर आपण माणूसच नाही, असंही अमितने म्हटलं आहे.

अमित साध आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांनी ‘का पो छे!’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट दोन्ही अभिनेत्यांच्या करिअरसाठी महत्वाचा ठरला होता.

दरम्यान, सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी करत असताना सीबीआयला बॉलीवूड मधील ड्र.ग्ज प्रकरणाचा सुगावा लागला. यानंतर ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याप्रकरणी तपास सुरु केला. एनसीबीला रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं रिया चक्रवर्तीच्या घरावर छापा टाकत एनसीबीनं तिला ता.ब्यात घेतलं होतं.

तसेच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्या विरोधात पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं त्याला देखील अ.टक केलं होतं. तब्बल 29 दिवसांच्या को.ठडीनंतर रिया चक्रवर्तीची सुटका झाली आहे.

रिया चक्रवर्तीच्या अ.टकेनंतर अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलीवूड मधील अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आली होती. नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांसारख्या बड्या अभिनेत्रींची नावे देखील अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! आता ‘या’ प्रकरणी चक्क महाराष्ट्राच्या राज्यपालांचीच सुप्रीम कोर्टात धाव

न्यूड फोटो शेअर करणाऱ्या मिलिंद सोमणला चाहत्यांनी ‘या’ कारणाने डोक्यावर घेतलं!

खुशखबर! तरुणाईची लाडकी ‘पब्जी’ आता भारतात पुन्हा येणार?

शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार? बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या…

भाजपला मोठा धक्का! भाजपला मी धडा शिकवणार म्हणत ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी