आता माणसांनंतर चक्क माकडंही करू लागली वेगवेगळ्या किड्या-मुंग्यांचं निरीक्षण, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

यामध्ये कधी हाणामारीचेही व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर कधी जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

आपल्याला माहित आहे की, मनुष्याचा एक गुण आहे की, त्याने आपल्या अवती-भवोती काही वेगळ पाहिलं की, तो त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जातो. त्या गोष्टीचे सगळीकडून निरीक्षण करतो. त्याचप्रमाणे एखादा नवा प्राणी, किडा जरी आपण पाहिला तरी आपण त्या किड्याला खूप निहाळतो.

तर याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क माकडं एका विंचवाला खालीवर निहाळत आहेत.

एका विंचवाला चारही बाजूने घेरलं असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो विंचू त्या माकडांमधून सुटण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू ती सगळीच माकडं त्याच्या जवळ जाऊन त्याचं निरिक्षण करत आहेत. काही माकडं तर त्याला विंचवाला हात लावत आहेत.

त्या माकडांकडे पाहून असं वाटतं आहे की, त्या माकडांनी यापूर्वी कधीच विंचूला पाहिलं नसावं. माकडांचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.

हा व्हिडीओ आयएफएस सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘Morphology class in progress’ असं कॅप्शनही दिलं आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, हा व्हिडीओ आतापर्यंत सहा हजार लोकांनी पाहिलं आहे.


महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनमध्ये हिंडणाऱ्या दोन तरूणांवर पोलिसांनी केली अनोखी…

लॉकडाऊनमध्ये बुलटवरून फिरणाऱ्या नव्या जोडप्याचं पोलिसांनी…

‘पैसे से दवा खरीदी जा सकती है स्वास्थ्य नही’;…

साथीदारांना वाचवण्यासाठी ती थेट भिडली सिंहाशी अन्…,…

चक्क माकडानं घेतली वाघाची मजा अन्…, पाहा व्हिडीओ