मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते आपले मत मांडताना तसेच आपले अपडेट्स चाहत्यांशी शेअर करताना दिसून येतात. अशातच आता अमिताभ बच्चन आणखी एका कारणासाठी चर्चेत आले आहेत.
आपल्या अभिनयासह आपल्या दमदार आवाजानं त्यांनी न केवळ बॉलिवूडमध्ये तर हॉलिवूडमध्येही त्यांनी आपली छाप सोडली आहे. त्यांचा आवाज ही त्यांची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. आता हाच आवाज आपल्याला अलेक्सावरही ऐकायला मिळणार आहे.
नुकतंच अमेझॉननं आपली बहुचर्चित सेवा असलेल्या अलेक्सावर अमिताभ बच्चन यांच्या आवाजाला लॉन्च केलं आहे. अलेक्सावर वर आपल्याला अमिताभ बच्चन यांचा आवाज सुरु करायचा असेल तर आपल्या आवाजात “Alexa, introduce me to Amitabh Bachchan” असं म्हणावं लागेल.
अमिताभ यांच्या चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी गेल्या वर्षी अमेझॉनने अलेक्सावर अमिताभ बच्चन यांचा आवाज आणणार असल्याची घोषणा केली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलेक्सासाठी स्वत:चा आवाज देणारे अमिताभ बच्चन हे पहिले भारतीय कलाकार ठरले आहेत.
या डिवाईसचे नाव असेल ‘बच्चन अलेक्सा’. ज्यात बिग बींच्या आवाजात हास्यविनोद, हवामान अंदाज, सल्ला, शायरी, कविता सारख्या अनेक गोष्टी ऐकायला मिळतील. त्यामुळे आता आपल्याला अलेक्सावरुन अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळेल.
भारतीय वापरकर्ते अमेझॉन शॉपिंग अॅपवरील माइक आयकॉन दाबून बच्चन यांचा आवाज त्यांच्या इको स्मार्ट डिस्प्ले आणि स्पीकरमध्ये जोडू शकतात. विशेष म्हणजे, हे वैशिष्ट्य केवळ अॅन्ड्राॅईड अॅपसाठी उपलब्ध आहे.
गूगल असिस्टंट आणि सिरी कडे वळणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अमेझाॅननं ही शक्कल लढवली असून 19 ऑगस्टपासून ही सेवा लॉन्च करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बाॅयकाॅटनंतर पुन्हा एकदा राधिकाचा बोल्ड लूक; सोशल मीडियाचं तापमान वाढवलं
बॉयफ्रेंडच्या भरवशावर तिने झाडावरून उलटी उडी मारली अन्…; पाहा व्हिडीओ
दीपिका लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? परिणिती चोप्रा म्हणाली…
‘शेरशाह’ चित्रपटासाठी सिध्दार्थने घेतलं तब्बल ‘इतके’ कोटी रुपये मानधन
…म्हणून नवरदेवाने भरमंडपात नवरीच्या पायावर डोकं ठेवलं; पाहा व्हिडीओ