आता भाजपचा ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर? राजकीय चर्चेला उधाण

पुणे | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अनेक राजकीय नेते येत्या काळात पक्षांतर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा चालू असतानाच आता भाजपला धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे.

भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चालू झाल्या आहेत. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणी अजित पवार यांची भेट झाली.

शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्या दरम्यान जवळपास एक तास विभागीय आयुक्त कार्यालयात चर्चा झाली आहे. यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती. या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

अजित पवारांबरोबरची भेट वैयक्तिक कारणांसाठी घेतली आहे, असं शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांची ही भेट कशासाठी होती, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची भेट घेतली आहे. तसेच अजित पवारांनी आज पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा देखील घेतला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांमुळे खडसे भाजप पक्षाला रामराम ठोकणार, असं सातत्यानं बोललं जात होतं. आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशीही माहिती समोर आली आहे. खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मौन सोडत उत्तर दिलं आहे.

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी मला काहीही माहित नाही. एकनाथ खडसे यांच्या विषयी जेवढी माहिती मला होती. ती सर्व माहिती मी माध्यमांना दिली आहे, असं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

तसेच राजकारणामध्ये नेत्यांच्या एकमेकांशी भेटीगाठी होत असतात. राज्यात भाजप सरकार असताना आम्हीही अनेकवेळा नेत्यांना भेटलो आहे. राजकारणात अनेकवेळा लोकप्रतिनिधींच्या नात्यानं भेटीगाठी घेतल्या जातात, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहन रॉय सुशांतच्या मृ.त्यूला जबाबदार? सीबीआयची मोठी कारवाई!

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी सोडलं मौन म्हणाले…

धक्कादायक! सुशांत प्रकरणी ‘ते’ वृत्त चुकीचे; सीबीआयने दिले स्पष्टीकरण

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणारी पायल ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

फाऊल प्लेचा निकाल देऊन सीबीआय सुशांत प्रकरण बंद करणार?