‘अब चंपाकली मुरझायी हैं’; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

पुणे | शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद-विवाद होणं काही नवी गोष्ट राहिलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

पुण्यात पार पडलेल्या एका सभेत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविषयी वक्तव्य केलेलं पहायला मिळालं.

अब चंपाकली मुरझायी हैं, कोल्हापुरातही पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही, असा कोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

कोल्हापूर उत्तरच्या विजयाबद्दल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं तसंच नेत्यांचं राऊत यांनी कौतुक केलेलं पहायला मिळालं.

दरम्यान, राज्यात सध्या बोंग्याचा विषय केंद्रबिंदू आहे. यावरुन राज्यभर, देशभर गदारोळ सुरु आहे.

काल संजय राऊत यांनी मनसेवर टीकास्त्र सोडलेलं पहायला मिळालं. त्यामुळे वातावरण आणखीनच गरम झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  उष्णतेच्या लाटेविषयी हवामान विभागाचा गंभीर इशारा, म्हणाले…

  राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

  “मी भाजपसोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही”

  कोरोनामुळे देशात ‘इतक्या’ लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यानं खळबळ

  “राज ठाकरेंच्या मनसे बरोबर युती करणं भाजपला परवडणार नाही”