वाहह! आता एका चाकाची इलेक्ट्रिक बाईक देखील रस्त्यावर धावणार, लूक देखील आहे अगदी भन्नाट
बीजिंग | कोरोनाकाळात अनेक उद्योगधंदे कित्येक महिन्यांसाठी बंद होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता सर्व उद्योगधंदे हळूहळू पूर्वस्थितीत येऊ पाहत आहेत. कोरोनानंतर अनेक नवीन गाड्या देखील बाजारात आल्या आहेत. अशातच आता आणखी एक भन्नाट गाडी लवकरंच रस्त्यावर धावताना दिसणार आहे.
चिनी ई कॉमर्स ग्रुप अलिबाबने ‘वन व्हील इलेक्ट्रिक बाईक’ सादर केली आहे. ही बाईक सादर होताच ग्राहक या बाईकचं भरभरून कौतुक करत आहेत. भारतीय ग्राहकांच्या देखील ही बाईक चांगलीच पसंतीस उतरली आहे.
अलिबाबने यापूर्वीच अनेक इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. तसेच काही गाड्यांना वायरलेस चार्जिंगची सुविधा देणार असल्याचं देखील घोषित केलं आहे. अशातच आता ही नवीन सिंगल व्हील इलेक्ट्रिक बाईक ग्राहकांना खास आकर्षित करत आहे.
अलिबाबने लाँच केलेल्या फोटोमध्ये स्टील ट्रेलिस फ्रेमसह फॉक्स फ्यूल टँकला सपोर्ट करणारी एकचाकी इलेक्ट्रिक बाईक पाहायला मिळतेय. या मोटारसायकलच्या टँकचे डिझाईन आणि रेड कलर ट्रेलिस फ्रेम डुकाटी मॉन्स्टरसारखं आहे. यामुळे ही बाईक अधिक आकर्षक दिसत आहे.
या बाईक मधील इलेक्ट्रिक मोटार 2000 वॅट्सची शक्ती देते. सिंगल व्हील ईव्ही मधील पॅनासॉनिक बॅटरी पॅक सिंगल चार्जमध्ये 60-100 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3-12 तास लागतात.
तसेच या बाईकमध्ये एक रियर पिलियन सीट देखील आहे. परंतु या सीटच्या फंक्शनालिटीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या इलेक्ट्रिक वन व्हीलरची किंमत 1,500 डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 1.34 लाख रुपये आहे.
दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अलीकडे लोक इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती दर्शवू लागले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या किमतींमुळे या वाहनांच्या किंमती देखील खूप जास्त आहेत.
महत्वाच्या बातम्या –
तरुणी उंटासोबत सेल्फी काढायला गेली अन् उंटाने केस धरून तिला…; पाहा व्हिडीओ
कोंबडी पाठीवर असताना मगरीने अचानक जबडा उघडला अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ
…अन् मलायका पँट न घालताच टेबलवर येऊन बसली; मलायकाने शेअर केला तो भन्नाट किस्सा
जाणून घ्या! चणे खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रशासनाने जारी…