महाराष्ट्र मुंबई

आमदारांच्या चालकांचा पगारही आता सरकार देणार

मुंबई | आमदारांच्या वाहनचालकाला देखील आता दरमहा 15 हजार रुपये वेतन मिळणार आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. त्‍यामुळे या अधिवेशनात आमदारांच्या विकासनिधीतही एक कोटींनी वाढ होऊन तो आता तीन कोटी रुपये झाला आहे.

आमदारांच्या वाहनचालकांचाही पगार आता सरकार देणार आहे. यामुळे सरकारवर दरवर्षी 6.60 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी याबाबतचे विधेयक विधानसभेत मांडलं.

आधी स्वीय सहायकाला दरमहा 15 हजार रुपये पगार मिळायचा. मागच्या सरकारने त्‍यात वाढ करून तो 25 हजार रुपये केला. वाहनचालकाला देखील सरकारने पगार द्यावा, अशी आमदारांची मागणी होती. त्‍याला अनुसरून हे विधेयक मांडण्यात आलं. एकमताने ते मंजूरही करण्यात आलं आहे.

दरम्यान, विधिमंडळाच्या याच अधिवेशनात याआधी आमदारांच्या विकासनिधीत एक कोटीची वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या – 

-रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही सांग, मुख्यमंत्र्यांचा शब्द

-नाम फाऊंडेशनला मिळणाऱ्या कोट्यावधींच्या देणग्यांचा पैसा जातो कुठे? – तनुश्री दत्त

-म्हणून पालकांनी लिहिलं मुख्यमंत्र्याना पत्र

-कोरोनाच्या झटका; आयपीएल संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय!

-सावधान पुणेकरांनो…आणखी एक कोरोनाचा रूग्ण सापडला