मुुंबई | अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायकाने आज देखील स्वतःला मेंटेन करून ठेवलं आहे. वय हा केवळ आणि केवळ एक आकडा असतो, हे मलायकाने सिद्ध केलं आहे.
फिटनेसमुळे चर्चेत राहणारी मलायका गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकाचा मुलगा अरहान पुढील शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. मुलगा परदेशी गेल्यामुळे मलायका आता एकटी पडली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने आपलं दुःख व्यक्त केलं होतं. अशातच आता मलायका पुन्हा आपल्या मुलाच्या आठवणीत व्याकूळ झालेली पाहायला मिळाली. आपला मुलगा आपल्या आसपास नसल्याचं सतत स्वतःला समजावण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचं यावेळी मलायकाने म्हटलं आहे.
हा काळ माझ्यासाठी खरंच खूप कठीण आहे. अरहान माझ्या आसपास नाही हे मी वारंवार मनाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु इतक्यात मला याची सवय होईल, असं मला वाटत नाही, असं मलायकाने यावेळी म्हटलं आहे.
अरहान गेल्या अनेक वर्षांपासून मलायकापाशी आहे. तो केव्हाच तिला सोडून लांब राहिला नाही. अरहान प्रथमच मलायकाला सोडून परदेशी गेला आहे. यामुळे मलायकाला हे दुःख सहन होत नाही.
दरम्यान, मलायका सिनेमांपेक्षा आपल्या फिटनेसमुळे खूप जास्त चर्चेत असते. ती अलीकडे खूप कमी चित्रपटांमध्ये दिसते. मात्र, रिऍलिटी शोजमध्ये जज म्हणून बहुतेकदा ती छोट्या पडद्यावर झळकते.
महत्वाच्या बातम्या-
ट्विंकलने पोस्ट शेअर केली अन् राखी भावूक झाली, वाचा काय आहे नेमकं प्रकरण
…म्हणून करीनाला सैफकडून नव्हे तर ‘अशा’ पद्धतीने मूल हवं होतं
सायरा बानोंची तब्येत खालावली, आयसीयुमध्ये उपचार सुरू
चक्क घरात शिरला बिबट्या अन्…, हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहु नका
माणुसकीला जागत कुत्र्याला वाचवण्यासाठी ‘या’ प्रकारे तरूणाने घेतली धाव, पाहा व्हायरल व्हिडीओ