इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली | आधी आमदार आणि आता नुकतेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेले एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 

औरंगाबाद लोकसभेची लढत अतिशय चुरशीची झाली होती. जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा जवळपास 5 हजार मतांनी पराभव केला होता. 

विधानसभेतले अभ्यासू आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं, आता त्याची प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने एमआयएमच्या कार्यकर्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

इम्तियाज जलील यांची पुर्वाश्रमीचे पत्रकार म्हणूनही चांगली कारकिर्द राहिलेली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातून राजकारणात यशस्वी पदार्पण केलं आणि आता ते औरंगाबादच्या जनतेचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. 

आता औरंगाबादचं राजकारण जातीच्या आधारावर नाही तर विकासाच्या धर्तीवर होईल, असं आश्वासन निवडून आल्यावर इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या जनतेला दिलं होतं.

 दरम्यान, इम्तियाज जलील हे वंचित बहुजन आघाडीचे एकमेव उमेदवार आहेत जे लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत.