धक्कादायक! आता ‘या’ प्रकरणी चक्क महाराष्ट्राच्या राज्यपालांचीच सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली | एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सतत कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असतात. अशातच आता भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उत्तराखंड उच्च न्यायालयाने केलेल्या अवमान कार्यवाहीमुळे सध्या भगतसिंग कोश्यारी अडचणीत आले आहेत.

उत्तराखंड उच्च न्यायालयाने भगतसिंग कोश्यारी यांना एक नोटीस बजावली होती. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री म्हणून कोश्यारी यांना देण्यात आलेल्या निवासस्थानाचे कोश्यारी यांनी अद्याप भाडे भरले नाही. याच पार्श्वभूमीवर कोश्यारी यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

मात्र, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या अवमान नोटीशीविरोधात कोश्यारी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे.

हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली जावी, अशी मागणी कोश्यारी यांनी या याचिकेत केली आहे. राज्यघटनेच्या कलम 361 नुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल पदावरील कोणत्याही व्यक्तीला संरक्षण मिळते, असं या याचिकेत म्हटलं आहे.

तसेच बाजारातील दराची शहानिशा न करता हे भाड निश्चित करण्यात आलं होतं. डेहराडून परिसरातील भाड्यापेाक्षा हे भाडं खूप जास्त होतं, असंही या याचिकेत म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रुरल लिटिगेशन अँड एंटाइटेलमेंट केंद्राने माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारी सुविधांच्या लाभापोटीचं भाडे सहा महिन्यात जमा करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. यानुसार उत्तराखंड उच्च न्यायालयाने कोश्यारींना भाडे भरण्याचे आदेश दिले होते.

मात्र, हे भाडे जमा न केल्याने कोर्टाने कोश्यारींना अवमानाची नोटीस बजावली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी 47 लाख 57 हजार 758 रुपये थकवल्याचा दावा हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील प्रार्थना स्थळे उघडण्यात यावीत यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रात ठाकरेंना तुम्ही धर्मनिरपेक्ष बनला आहात काय? असा आक्षेपार्ह्य सवाल देखील विचारला होता.

भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रामुळे डाव्या विचारसरणीचे लोक कोश्यारी यांच्यावर चांगलेच भडकले होते. भगतसिंग कोश्यारी यांनी प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्यघटनेचा अपमान आणि भंग केला आहे, असं मत लोकांनी व्यक्त केलं होतं.

तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या कृतीमुळे त्यांना राज्यपालाच्या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणीही डाव्या पक्षांकडून करण्यात आली होती. राज्यपालांना पदावरून हटविण्याबाबत डाव्या पक्षांकडून राष्ट्रपतींना निवेदनंही देण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूड फोटो शेअर करणाऱ्या मिलिंद सोमणला चाहत्यांनी ‘या’ कारणाने डोक्यावर घेतलं!

खुशखबर! तरुणाईची लाडकी ‘पब्जी’ आता भारतात पुन्हा येणार?

शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार? बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या…

भाजपला मोठा धक्का! भाजपला मी धडा शिकवणार म्हणत ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी

मोठी बातमी! खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरचा पवारांचा पहिलाच खानदेश दौरा ‘या’ कारणामुळे रद्द