मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीचे तीव्र पडसाद उमटलेले आता पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे व शिंदेगटातील बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
अनेक बंडखोर आमदारांचं कार्यालय आज शिवसैनिकांकडून फोडण्यात आलं. त्यात शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या बघता शिवसेनेतील राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे.
शिवसेना भवनात आज पक्षाची कार्यकारीणी बैठक पार पडली. या बैठकीत 6 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले असून किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली.
6 ठरांवमध्ये 2 ठराव हे राजकीय असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. तर यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली.
पक्षाने सध्यातरी एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून काढलं नाही. मात्र, एकनाथ शिंदेंचं नेतेपद काढायची आता वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
पेटवणं वगैरे आमचं काम नाही. शिवसेना संयम ठेवून आहे. पण त्यांनी शिवसेनेच्या आईवर हात घातला आहे. शिवसैनिक आता कसे गप्प बसतील, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, शिवसेना ही बाळासाहेबांची आहे व राहिल. त्यामुळे इतर कोणालाही बाळासाहेबांचं नाव वापरता येणार नाही, असा ठराव आजच्या बैठकीत मंजूर झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“कुठलाही गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही, मतं मागायचीच असतील तर…”
मोठी बातमी! मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू
उद्धव ठाकरेंना मोठा झटका! शिंदे गटाचं नाव ठरलं?
महाविकास आघाडीची शिवसेना आमदारांवर मोठी कारवाई, एकनाथ शिंदे म्हणतात…
सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी होणार?