मुंबई | महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत घेतला होता. त्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पहायला मिळालं होतं.
अशातच आता ठाकरे सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने आता राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता वाद पेटण्याची देखील शक्यता आहे.
महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचं जतन व्हावं आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्याची नावे देण्याचा निर्णय झाला असल्याचं सांगिण्यात आलं आहे.
आदित्य ठाकरे यांच्या बंगल्याला रायगड नाव देण्यात आलं आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याला शिवगड नाव दिलं आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याला सिंहगड नाव दिलंय तर वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याचं नामकरण पावनगड असं करण्यात येणार आहे.
उदय सामंत यांच्या बंगल्याचं नाव रत्नसिंधू करण्यात येईल तर केसी पाडवी यांच्या घराचं नामकरण प्रतापगड करण्यात येणार आहे.
अमित देशमुख यांच्या घराचं नाव आता जिंजरा असणार आहे तर हसन मुश्रीफ यांच्या बंगल्याचं विजयदुर्ग आणि दादा भुसे यांच्या घराचं नाव राजगड असेल.
दरम्यान, बंगल्याच्या या नामकरणावर आता वाद होण्याची चिन्हे आहेत. यावर आता शिवप्रेमी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘नाय वरनभात लोन्चा’ चित्रपटात आक्षेपार्ह दृश्य; महेश मांजरेकर म्हणतात…
कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच, तो माझा हक्कच- किरण माने
राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख