मुंबई | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणारे हे व्हिडीओ केव्हा आपलं मनोरंजन करून जातात तर केव्हा आपल्याला चांगली शिकवण देऊन जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा आपल्या मालकावर चांगलाच संतापलेला दिसत आहे. रागात येऊन हा कुत्रा आपल्या मालकासमोर खाण्याचं भांडही आणून आदळतो. कुत्र्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
तुम्हाला जर केव्हा जोरदार भूक लागली असेल. तुम्हाला भूक लागल्याने काहीच समजत नसेल. अशावेळी तुम्हाला कोणी रिकामं ताट दिलं तर तुमचा देखील राग अनावर होईल, हो ना? हेच या कुत्र्यासोबत देखील झालं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील कुत्र्याला प्रचंड भूक लागलेली आहे. पण या कुत्र्याचा मालक त्याच्यासमोर एक रिकामं भांड ठेवतो. हे रिकामं भांड पाहून कुत्रा खूप चिडतो. त्याचा राग अनावर होतो.
आपल्या भांड्यात खायला नसल्याचं पाहून तो जोरजोरात भुंकू लागतो. यानंतर कुत्रा आपल्या मालकाकडे जातो आणि त्याच्याकडे पाहून भुंकू लागतो. कुत्र्याचा मालक त्याचा राग पाहून त्याच्यावर हसू लागतो. हे पाहून कुत्रा आणखी रागावतो. मग कुत्रा आपलं रिकामं भांड तोंडात धरून आणतो आणि मालकासमोर आदळतो.
जणू काही हा कुत्रा आपल्या मालकाला सवाल करत आहे की, माझं भांड रिकामं का आहे? यात मला खायला का दिलं नाही. तसेच हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील बोलाल की, हा कुत्रा आपल्या मालकाला जेवणच मागत आहे.
आयएफएस अधिकारी प्रवीण अंगुस्वामी यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडीओवर अंगुस्वामी यांनी मजेशीर कॅप्शन देखील दिला आहे. भूक लागल्याच्या अर्ध्या सेकंदानंतर तुमची प्रतिक्रिया, असं कॅप्शन अंगुस्वामी यांनी या व्हिडीओवर दिला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. नेटकरी यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओ वरील मजेशीर कमेंट्स देखील आपल्याला खूप हसवून सोडत आहेत.
0.5 micro seconds after I get hungry pic.twitter.com/K4je9iBI0u
— Praveen Angusamy, IFS 🐾 (@PraveenIFShere) April 5, 2021
महत्वाच्या बातम्या –
‘मिशन मजनू’च्या सेटवर दुर्घटना! सीन करताना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला झाली दुखापत
अभिनेत्री करिना कपूरच्या ‘या’ मास्कची सर्वत्र…
तरूणाने हाताऐवजी तोंडात धरला चिप्स अन्, पुढे जे घडलं ते…
तरूणाने केला हवेत खतरनाक स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्याही…
केस कापताना तो ओक्साबोक्सी रडू लागला, व्हिडीओ पाहून तुम्ही…