मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवेनवे खुलासे होत आहे. मुंबईतील जेलमध्ये दोन आठवडे उलटल्यानंतर रिया चक्रवर्ती हिने दुसऱ्यांदा आपला जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. रिया म्हणाली की, एनसीबीच्या निशाणावर मी आहे पण त्यांना कोणतेही पुरावे मिळाले नाही.
मुंबईत जोरदार पाऊस असल्यामुळे रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची सुनावणी एक दिवस पुढे ढककली आहे. त्या याचिकेत रियाने स्पष्ट म्हटलंय की, सुशांतने अवैध ड्र.ग्जचा वापर केला होता आणि त्याला हे ड्र.ग्ज आपल्या स्टाफ कर्मचाऱ्यांकडून मिळत होते.
रिया म्हणाली, एक गोष्ट खूपच वेगळी आहे. ड्र.ग्ज घेणाऱ्या व्यक्तीला एक वर्षाची शिक्षा होते, पण त्यातच काही वेळा जर ड्र.ग्ज विकत घेतले असेल तर २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. सुशांतने आपल्या स्टाफ कर्मचाऱ्यांचा वापर करून ड्र.ग्जचे व्यसन चालू ठेवले आणि त्याचबरोबर मागे कोणताही पुरावा सुटणार नाही, याची पूर्ण काळजी त्याने घेतली होती.
सार्वजनिक डोमेनच्या माहितीनुसार, सुशांतने आपल्या मृत्यूच्या तीन दिवस आधी त्याचा कुक नीरज याला गां.जाचे जॉईन्ट बनवून त्याचा एक बॉक्स बेडरूममध्ये ठेवण्यास सांगितले होते. नीरजने ही माहिती सीबीआय आणि मुंबई पोलिसांना दिली आहे. जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला, तेव्हा तो बॉक्स तिथे सापडला होता, म्हणजेच सुशांतने ते सर्व घेतले होते.
या जामीन अर्जात रियाने लिहिलंय की, सुशांतला आपल्या मित्रांसोबत राहायला खूप आवडायचं. सुशांत अमेरिकन टीव्ही शो एंटूराज या कार्यक्रमाने खूपच प्रभावित झाला होता. त्या कार्यक्रमात कुटुंब आणि मित्रांमध्ये राहण्याची संकल्पना दाखवली आहे. त्याचबरोबर सुशांतच्या मित्रांचीही आवड अॅस्ट्रॉनॉमी, ग्लोबल वॉरफेअर आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स या विषयांमध्ये होती, त्यामुळे त्यांच्याबरोबर सुशांतला राहायला आवडायचे.
२०१५-१६ च्या दरम्यान केदारनाथ चित्रपटाचे दिग्दर्शन चालू होते. तेव्हापासून त्याला गां.जा आणि जॉईन्ट ओढण्याची सवय लागली होती. यावरून रिया त्याला नेहमी बोलायची. यातून सुशांतला चांगले व्हायचे होते. त्यामुळे तो हिंदुजा रुग्णालयात चार दिवस उपचार घेत होता. याचबरोबर सुशांत आयुर्वेदिक पर्यायाकडेही पाहत होता. १० जानेवारीला सुशांतने रियाला घरी बोलावले आणि त्याने सांगितले की, मी हॉलिवूड अभिनेता जिम कॅरी याचा डिप्रेशनचा सर्व प्रवास पाहिला आणि यातून मी खूपच प्रभावित झालो आहे.
त्यानंतर काही दिवसांनंतर सुशांत मोठ्या बहिणीला भेटायला चंदीगडला गेला होता. तेथून पुन्हा परत आल्यावर सुशांत म्हणाला की, मला कोणत्याच प्रकारचे डिप्रेशन नाही, त्यामुळे मी कोणतेच औषध घेणार नाही. मी चांगला ठणठणीत आहे. पण अशा परिस्थितीतही सुशांत जॉईन्ट पितच होता.
यानंतर प्रसिद्ध अभिनेते इरफान खान आणि ऋषि कपूर यांच्या मृत्यूने सुशांतला चांगलाच झटका बसला. ३० मेला सुशांतच्या संदर्भात वृत्तपत्रात एक लेख छापून आला होता, त्यात सुशांतबरोबर काम करण्यात अनेक अडचणी येतात आणि त्यांच्या स्वभावामुळे अनेक लोक अडचणी येतात, असं लिहिलेलं होतं. यामुळे सुशांत खूपच डिस्टर्ब झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांतच्या मृ.त्यूचं गूढ अखेर उलघडलं, सीएफएसएलनं दिला अंतिम अहवाल
कंगनाला मोठा झटका! ‘या’ प्रकरणी कंगनाचीही चौकशी होणार?
रियानं जा.मीन अर्जात सुशांतवर केला ‘हा’ गंभीर आ.रोप! पाहा काय म्हणाली रिया
जिओनं लाँच केला सर्वात पॉप्युलर प्लॅन; रोज 3 GB डेटा मिळतोय फक्त ‘इतक्या’ रुपयात!
रेशनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी, नाहीतर…