मुंबई | सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील वातावरण चांगलंच खवळलं आहे. आज सलग चौथ्या दिवशीही या संपाचा तोटा मात्र प्रवाशांना होत आहे. प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे.
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आता संप मागे घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला खासगी चालकांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वादात प्रवाशांचे कोंडी होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं आत खासगी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस आणि मालवाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी दिली आहे. मात्र आता खासगी चालकांनीही एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या या संपामुळे आर्थिक नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे दररोज 13 कोटींचे नुकसान होत आहे. या संपामुळे एसटीचा संचित तोटा हा तब्बल साडेबारा हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे.
तरीही राज्य सरकारकडून वारंवार संप मागे घेण्यास सांगितला जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी अद्याप काही हा संप मागे घेतलेला नाही. पुण्यातील खासगी वाहतूकदारांनी मोठा निर्णय घेतला आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी खासगी वाहतूक बंद करणार आहे.
पुण्याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्येही खासगी चालकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रवाशांना तर आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
ऐन दिवाळीच्या मुहुर्तावरच कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारल्यामुळे सणासुदीच्या काळातच प्रवाशांची कोंडी पहायला मिळाली. आता हे आंदोलन जास्तच तीव्र होताना दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही संप मागे घेण्याची विनंती कर्माचाऱ्यांना केली आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचलं आहे. उच्च न्यायालयानं महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी समजण्यात यावं म्हणून समिती स्थापन केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…हे आधी तुम्ही सिद्ध करा’; मुंबई उच्च न्यायालयाचा ज्ञानदेव वानखेडेंना झटका
“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात”
“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली”
मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’
‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत