आता ‘या’ पद्धतीने बदलता येणार फाटक्या नोटा, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | भारत देशाला प्रगतशील देश म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आता भारत देश हा हळू-हळू अधुनिक होत चालला आहे. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत चालल्या आहेत.

उद्योग धंदे, व्यावसाय यांचे व्यवहार हे आधी ऑफलाईन पद्धतीने व्हायचे. परंतू आता सर्व प्रकारचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याचं पाहायला मिळतं. पूर्वी लोकांना पैसे साठून ठेवायचे असल्यास, ते घरात ठेवायचे. मात्र  ऑनलाईनच्या जमान्यामध्ये जास्तित जास्त लोक आपल्याकडील पैसे घरात न ठेवता, बँकेत ठेवतात.

पैशांची गरज लागल्यास बँकेत रांगेत उभं न राहता. थेट एटीएममधून पैसे काढतात. यादरम्यान काही-काही वेेळा फाटक्या नोटा येतात. परंतू एटएममधून आलेल्या या फाटक्या नोटांचे काय करायचे?, त्या कशा बदलायच्या असे प्रश्न ग्राहकांना पडत असतं. आता मात्र ग्राहकांना आपल्या फाटक्या नोटा  बदलाता येणार आहे.

एप्रिल 2017मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, सर्व बँकेांमध्ये त्यांच्या ग्राहकांचे फाटक्या नोटा बदलल्या जातील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांनुसार एटीएममधून निघणाऱ्या फाटक्या चलन नोटा बँकांना बदलून द्याव्या लागतील. याला कोणतीही सरकारी बँक (पीएसबी) ना खासगी बँक नाकारू शकत नाहीत.

बँकेने एखाद्या ग्राहकाच्या नोटांची अदला-बदल करण्यास नकार दिला तर, त्या बँकेवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीमध्ये नमूद केलं आहे.

जर तुम्हाला एखादी बँक नोटा बदलण्यास नकार देत असेल, तर तो ग्राहक त्या बँकेविरोधात पोलीस स्टेशममध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकतो. त्यानंतर त्या बँकेला दहा हजार रूपये दंड आकारण्यात येणार असल्याचं रिर्झव्ह बँकेने म्हटलं आहे.

अशाप्रकारे नोटा बदला येतात-

सगळ्यात पहिल्यांदा आपण पैसे काढलेल्या एटीएमच्या बँकेत जावे. त्यानंतर त्या बँकेला अर्ज द्यावा. अर्ज भरताना त्या अर्जामागे पैसे काढल्याची तारिख, वेळ आणि वार. तसेच त्या एटीएमचे स्थान या सगळ्याची माहिती अर्जावर भरावी.

जर आपल्याकडे बँकेची स्लिप नसेल, तर आपण ही सगळी माहीती मोबाईलव्दारेही देऊ शकता. तुम्ही अर्ज केल्यानंतर बँकेचे अधिकारी किंवा कर्मचारी तो अर्ज तपासून तुम्हाला तुमच्या फाटक्या नोटा बदलून. कोऱ्या करकरीत नोटा देतील.

महत्वाच्या बातम्या-

मोठ्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा चढले; वाचा आजचे…

सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणाऱ्या ‘या’ गाडीची…

कोल्हापुरात भर रस्त्यात राडा! नगराध्यक्षांनीच ग्रामस्थाच्या…

काय बोलावं आता! टीव्हीवर लाईव्ह असतानाच कुत्र्यानं तिच्या…

राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे आज…