आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई

मुंबई | सोशल मीडियाच्या माध्यमातून आता जग खूप प्रगती करत आहे. एकमेकांशी संपर्क करण्याचं माध्यम असणारं सोशल मीडिया आता हळहळू बदलायला लागलं आहे.

जगाला आपल्या सर्वोत्तम कलाकृतीच्या प्रेमात पाडणारा फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग सध्या आपल्या कंपनीच्या माध्यमातून विविध सोशल मीडिया चालवत आहे.

मार्क झुकरबर्गनं आपली कंपनी फेसबुकचं नाव बदलून मेटा केल्यानंतर आता अमुलाग्र बदल करण्यास सुरूवात केली आहे. त्यातील एक म्हणजे इन्स्टाग्रामला अधिक लोकप्रिय बनवण्याचा विचार मेटा करत आहे.

संभाषण, फोटो फिचर, व्हिडीओ पोस्ट, याखेरीज आता इन्स्टाग्राम हे सामान्य युझर्सना पैसे कमावण्याची संधी देणार आहे. परिणामी इन्स्टाग्रामच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.

इन्स्टग्राम पेजवर सब्सक्रिप्शन फिचर चालू करण्यात आलं आहे. डिजीटल लेवलवर व्हिडीओ आणि पोस्ट करणाऱ्यांना क्रिएटर्सना याचा फायदा होणार आहे.

पहिल्यांदा अमेरिकेतील काही क्रिएटर्सना या फिचरवर आपले व्हिडीओ टाकण्यास मुभा देण्यात आली. त्यांचे पेड फाॅलोअर्स त्या क्रिएटर्सचे व्हिडीओ आणि पोस्ट पेड केल्यावर पाहू शकतात.

क्रिएटर्स आपल्या कंटेट आणि व्हिडीओची किंमत स्वत: ठरवू शकतील. 0.99 डाॅलर्स पासून 99.99 डाॅलर्सपर्यंत महिन्याला 8 प्राइस पाॅइंट क्रिएटर्सना देण्यात येणार आहेत.

क्रिएटीव्हीटी वाढवण्याच्या दृष्टीनं इन्स्टाग्रामनं हे फिचर सुरू केलं आहे. जो जास्त क्रिएटिव्ह असेल त्याला त्या प्रमाणात पैसे मिळणार आहेत. परिणामी पैसे कमावण्याच संधी चांगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!

टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज

 बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, आता…

‘…अशा नामर्द माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे’; चित्रा वाघ संतापल्या