“आता कुठं तरी थांबावं लागेल”, निवृत्तीनंतर विक्रम गोखले करणार ‘हे’ काम

मुंबई | खुलेपणाने राजकीय मतं व्यक्त करणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

अशातच सुभेदार वाड़ा कट्टा आयजित एका व्याख्यान मालेत विक्रम गोखले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

एखादं नृत्य सादर करताना, गोष्ट सांगताना आणि विनोद करताना मेहनत तर घ्यावीच लागते. ते योग्यच आहे. तुम्ही वास्तववादी नाटकांसारखं असून चालत नाही.

परंतू आपण या कलेला विसरून गेलोय. या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो आणि आता माझं त्रास करून घेण्याचं वय नाही, असं विक्रम गोखले म्हणाले आहेत.

माझं काम आता हळूहळू कमी होत आहे आणि मी कमी करतोय. आता कुठं तरी थांबायला पाहिजे, अशं सुचक वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विक्रम गोखले अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेणार असल्याचं दिसत आहे.

ज्याला शिकण्याची इच्छा आहे, त्याला मी शिकवतो. शाळा आणि काॅलेजची ज्याप्रकारे शिकण्याची इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांनी शिकवतो, असं गोखले म्हणाले. त्यामुळे आता निवृत्तीनंतर विक्रम गोखले अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना शिकवणार आहेत.

आपल्या गुरूंकडून वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला जे मिळालं ते पुढच्या पिठीला देणं गरजेचं असल्याचं मत देखील गोखले यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

अण्णा हजारे ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले…

“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, पुढचे 25 -30 वर्ष तरी…” 

देशात नवीन राष्ट्रपिता तयार होतोय, त्याचं नाव नथुराम गोडसे- तुषार गांधी 

भारतासाठी गुड न्यूज; कोरोनाबाबत ही महत्वाची माहिती समोर 

‘भिकार सीरियल पाहणं बंद करा’; विक्रम गोखले भडकले