‘आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे’; ‘या’ मंत्र्याने देवेंद्र फडणवीसांना केली विनंती

मुंबई |  गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. तरीदेखील कोरोना आटोक्यात येत नाहीय. याचा सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्र राज्याला बसत आहे. सध्या राज्यात पुन्हा लॉकडाऊन होतय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशातच माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता आपणच शासनाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती प्रकाश मेहता यांनी देवेंद्र फडणवीसांना केली आहे.

यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात वाढला आहे. आज घाटकोपरमध्ये सर्वाधिक 327 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच स्थानिक रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागा रिकाम्या नाहीत. परत पूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ येणार की काय, असं वाटू लागलं आहे, असं प्रकाश मेहता यांनी म्हटलं आहे.

कित्येकांचेे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असून एकाच रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण वेगवगळ्या वॉर्डमध्ये दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे हे सगळं वेळीच थांबवण्यासाठी कृपया तुम्ही सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे, असं ते म्हणाले.

राज्यात गेल्या चोवीस तासात 35 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 20 हाजार 444 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये नांदेड, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये वीकेडं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्या-

पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही…

मोठी बातमी! आता ‘या’ जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’…

अळूची पाने खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर, जाणून घ्या…

सचिन वांझेंचा पाय आणखी खोलात, एनआयएला वांझेंच्या घरात 62…