NRC प्रमाणं SRC हा कायदा देशात लागू करावा; मनसेची मागणी

मुंबई | संपूर्ण देशामध्ये NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मुद्दा गाजत असताना मनसेने एनआरसीच्या धर्तीवर SRC हा कायदा देशात असावा, असं म्हटलं आहे. मनसे नेेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून SRC कायदा असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

NRC प्रमाणेच SRC म्हणजेच…. State Register of Citizens देखील संपूर्ण देशात लागू झाले पाहिजे, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एखाद्या राज्यात परराज्यातून येणाऱ्या लोंढ्याना निर्बंध बसेल. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल, असंही देशपांडे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात परराज्यातून येणाऱ्या लोंढ्याविरोधात मनसेने सतत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. हे लोंढे थांबावेत आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना पहिल्यांदा नोकरीत स्थान मिळावं, अशी आग्रही भूमिका मनसे घेत आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेची ही नवी मागणी लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, State Register of Citizens कायदा देशात लागू करण्यात यावा, या मनसेच्या मागणीवर सरकार कश्या पद्धतीने पाऊल उचलतंय, पे पाहावं लागेल.

 

महत्त्वाच्या बातम्या-