नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला चपलेचा हार घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासण्याचा निंदनीय कृत्य केलं असल्याचंही समोर आलं आहे. मध्यरात्री ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांनी हा निंदनीय प्रकार केल्याचं उघड झालं आहे. या प्रकारामुळे दिल्ली विद्यापीठात मोठा गोंधळ निर्माण झाला असून एनएसयूआयच्या कृत्याबद्दल देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) विद्यापीठाच्या आवारामधील कला शाखेच्या गेटजवळ वीर सावरकर, सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांचा पुतळा उभारला होता. शक्ती सिंग आणि सिद्धार्थ यादव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला होता.
एनएसयूआय आणि डाव्या विद्यार्थी संघटनानी विरोध करत हा पुतळा विनापरवानगी बसवण्यात आल्याने तो हटवण्याची मागणी केली होती.
दरम्यान, यावरून एनएसयूआय आणि एबीव्हीपी आमनेसामने आले होते. यातूनच हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नक्की काय आहे ‘मिशन टेस्ट वर्ल्ड कप’???
-‘या’ खेळाडूंना असणार इतिहास घडवण्याची संधी
-“लाव रे तो व्हीडिओमुळेच ‘ईडी’कडून राज ठाकरेंची चौकशी”