अभिनेता मिलिंद सोमण गोव्याच्या बीचवर न्यू.ड होवून पळाला अन् मग…

मुंबई | अभिनेता मिलिंद सोमण नेहमीच त्यांच्या फोटो शूटमुळे वा.दाच्या घेऱ्यात असतो. मिलिंद त्यांच्या आई आणि पत्नी सोबतचे फोटो शेअर करततात त्यामुळे ते चर्चेत असतात.  सोमण यांच्या पूर्णपणे न्यू.ड असणाऱ्या एका फोटोमुळे ते पुन्हा एकदा वा.दाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

मिलिंद यांनी बुधवारी सकाळी हा फोटो सोशल मीडियावर टाकला. आता जवळपास 30 वर्षानंतर पुन्हा एकदा मिलिंदने असं फोटोशूट केलं आहे. मिलिंद सोमण यांनी आपल्या 55व्या वाढदिवसानिमित्त एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात मिलिंदने समुद्र किनाऱ्यावरून एक धाव घेतली आहे. एरवी ही धाव कुणीही घेतली असती तर फार फरक पडला नसता, पण मिलिंद यांनी ही धाव नागवी घेतली आहे. ही धाव घेताना मिलिंद यांच्या अंगावर एकही कपडा नाही. याला न्यू.ड रन असंही म्हटलं जातं.

मिलिंद यांच्या पत्नीने त्यांचा हा फोटो काढला असून तिनेही आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंदच्या चाहत्यांनी त्यांचं या धाडसाबद्दल कौतुक केलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात समुद्र किनारी फोटोशूट केल्यानं पूनम पांडेला अ.टक झाल्याची घटना ताजी असतानाच गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यू.ड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमण हे देखील अडचणीत आले आहेत. या फोटोशूटमुळे त्यांच्या विरोधात गोव्यातील वास्को पोलीस ठाण्यात गु.न्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद सोमण यांनी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यू.ड होऊन पळतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. सोमण यांच्या याच फोटोशूटवर गोवा सुरक्षा मंचने त्यांच्याविरोधात तक्रार नोंंदवली आहे. मिलिंद सोमण यांच्याविरुद्ध कलम 294 आणि कलम 67 अंतर्गत गु.न्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद सोमण 4 नोव्हेंबरला आपल्या पत्नीसोबत गोव्यात गेले होते.

त्यावेळी मिलिंद यांनी समुद्र किनाऱ्यावर न्यू.ड फोटोशूट केला. तसेच स्वत:चा न्यू.ड फोटो आपल्या इन्टाग्राम अकाऊंटर पोस्ट करत फोटोला ‘हॅपी बर्थडे टू मी’ असं कॅप्शन दिलं. त्यानंतर मिलींद यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला .मिलींद यांच्या या फोटोवर गोव्यातील स्थानिक राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवला आहे.

या पक्षाने मिलिंद सोमण यांच्या विरोधात वास्को पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी गोवा सुरक्षा मंचने ‘सोमण यांनी न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे गोव्याची प्रतिमा आणि संस्कृतीचा अपमान होत असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बो.ल्ड सीन शूट करताना मिथुनचा ताबा सुटला आणि त्याने माझ्यावर…; ‘या’ बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

सुशांत प्रकरणी चालू झालेल्या ‘त्या’ वादावर अखेर अभिषेकनं मौन सोडलं म्हणाला…

जॅकलीन फर्नांडीसचा मोठा खुलासा! म्हणाली सलमानने फार्म हाऊसवर माझ्या सोबत…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आणखी एका व्यक्तीला एनसीबीनं रंगेहात पकडलं

‘त्या’ प्रकरणावरून भाजप नेते आक्रमक! आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंसह कॉंग्रेसवर केला घणाघात