खळबळजनक! न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेल्या खासदाराचा घरी सापडला मृतदेह

इस्लामाबाद | पाकिस्तानी खासदार आणि टीव्ही होस्ट अमीर लियाकत हुसैन यांचं निधन झालं आहे. आमिर लियाकत त्याच्या घरात बेशुद्धावस्थेत सापडला होता, त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती.

बुधवारी रात्री आमिरची तब्येत अचानक बिघडली, मात्र त्याने हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिला. त्याचा स्टाफ मेंबर जावेदने सांगितलं की, गुरुवारी सकाळी आमिरच्या रूममधून ओरडण्याचा आवाज आला. हे ऐकून आमिरच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा तोडला.

नॅशनल असेंब्लीचे स्पीकर परवेझ अश्रफ यांनी या वृत्तांना दुजोरा दिला असून  निधनामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आलं.

पीटीआयमध्ये येण्यापूर्वी आमिर एमक्यूएम-पीचा सदस्य होता. जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते.

पंतप्रधान शाहबाज शरीफ, सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह, माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी, पीपीपी अध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी लियाकत हुसैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आता माझा नंबर असेल, कारण जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला…” 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अतिविराट सभा पाहून टीका करणाऱ्यांची बुबूळं बाहेर आली असतील “ 

राज्यावर अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार 

“रोज स्वप्नात उद्या सरकार पडणार असं येतं आणि…”; मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीसांना चिमटे