‘ओ तेरी’! अनुष्कानं पति विराटला एकदा नाहीतर दोनदा उचलून दाखवली आपली ताकद, पाहा व्हिडीओ

मुंबई| बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हे दोघे ‘पाॅवरकपल’ म्हणून ओळखले जातात. ही जोडी देशातली सर्वांधिक चर्चेत राहणारी जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांचाही चांगला चाहता वर्ग आहे आणि या दोघांच्या खास बॉन्डिंगला चाहत्यांची पसंतीही नेहमीच मिळताना दिसते.

अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. नेहमी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. यातच अनुष्कानं शेअर केलेल्या एका व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अनुष्कानं सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा विराट कोहलीला उचलताना दिसत आहे. यावेळी मात्र अनुष्काचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला.

या व्हिडिओत अनुष्का आपला पती विराट कोहली याला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एकदा नाही तर दोनदा तिने त्याला उचललंसुद्धा! हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना तुफान आवडला आहे आणि ते तिच्या ताकदीचं कौतुकही करताना दिसत आहेत.

अनुष्का शर्मानं तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘मी करूनदाखवलं’ तिनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे आणि त्यावर युझर्सच्या मजेदार कमेंट पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर खुद्द विराटनेसुद्धा अनुष्काच्या या व्हिडीओवर हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

अनुष्का नेहमीच कुठलीतरी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. कधी चिमुकल्या वामिकासोबतचे सुंदर फोटो, तर कधी नवरोबा विराट कोहलीसोबत क्वॉलिटी टाईम घालवतानाचे क्षण.

आईपणाच्या विश्रांतीनंतर अनुष्काने पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. नुकतंच तिने एका जाहिरातीसाठी चित्रीकरणाच्या वेळचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. जानेवारी महिन्यात अनुष्काने मुलीला जन्म दिला. तिचं नाव ‘वामिका’ असं ठेवलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

महत्वाच्या बातम्या – 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’…

राशीभविष्य: आज ‘या’ राशीच्या लोकांना होणार धनलाभ

‘या’ बड्या अभिनेत्री देखील लग्नाआधी होत्या…

भाऊ कदम कसे करतात स्क्रिप्टचे पाठांतर?, पाहा व्हिडीओ

देसी जुगाड वापरत ‘या’ काकांनी ब्लेडशिवाय केली…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy