OBC Reservation l मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज कडाडणार! ओबीसी नेते घेणार मोठा निर्णय

OBC Reservation l महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न अखेर सुटला आहे. महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळ आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या चर्चेत आरक्षणाबाबत तोडगा निघाला. अशात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आणि उपोषण दोन्ही संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर ओबीसी समाजाने कडाडून विरोध केला आहे. (OBC Reservation)

OBC Reservation l मंत्री छगन भुजबळ यांनी केली नाराजी व्यक्त :

याबाबत मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेच्या मागणीला विरोध केला असल्याचे समोर येत आहे. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, हा अध्यादेश नाही ड्राफ्ट आहे तर हा नोटिफिकेशनचा मसुदा आहे. ओबीसी समाज 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती घेऊ असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे.

तसेच तुम्हाला जर असे वाटत असेल की, मराठा समाजाचा विजय झाला आहे. (Maratha Reservation) मात्र मला तसे काही वाटत नाही. झुंडशाहीच्या विरोधात निर्णय घेता येत नाहीत. ही एक प्रकारे सूचना आहे. सरकारने 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती (OBC Reservation) मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्यात. असे आवाहन देखील मंत्री छगन बाहुबल यांनी केले आहे.

OBC Reservation l उद्या ओबीसी नेते आणि विविध संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक :

अशातच उद्या म्हणजेच रविवारी 28 जानेवारीला अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि विविध संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकी दरम्यान सर्व विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही यासंदर्भात सरकारसोबत (Chhagan Bhujbal) बातचीत करण्यात येणार आहे. याशिवाय ओबीसी समाजावर कसलाही अन्याय होणार नाही असे यासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊ असल्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. (OBC Reservation)

News Title : OBC community will be affected by Maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या-

Who is Manoj Jarange l कोण आहेत मनोज जरांगे? प्रत्येक मराठ्याला हे माहित असायलाच हवं

Manoj Jarange Patil l मराठा समाजाला आरक्षण मिळताच मनोज जरांगेंनी केले असे काही की…

Best Two Wheelers under 1 Lakh l कमी बजेटमध्ये बाईक खरेदी करायची? तर मग या 5 बाईक आहेत सर्वात बेस्ट

Manoj Jarange Patil Live l जाणून घेऊयात सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?

Maratha Reservation l मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश; मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य