नवी दिल्ली | आजच्या काळात लठ्ठपणा ही एक खूप मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे लोकांना अनेक आजारांना समोरं जावं लागतं.
धावपळीचं जीवनशैली, अति खाणं, जंक आणि फास्ट फूड खाणं, झोप न लागणं, तणाव घेणं, चुकीच्या खाण्याच्या सवयी, आनुवंशिकता अशी बरीच लठ्ठपणाची कारणे आहेत.
लठ्ठपणामुळे व्यक्तींना अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. दर 10 पैकी किमान 4 ते 5 जण वजन वाढण्याच्या समस्येला त्रस्त असलेले पहायला मिळतात.
जेव्हा शरीरामध्ये जास्त प्रमाणात चरबी वाढते तेव्हा त्याचा दबाव हाडे व इतर अवयवांवर पडतो. त्याचबरोबर हार्मोन्स आणि मेटाबॉलिज्म देखील बदलू शकते, जे शरीरासाठी हानिकारक आहे.
लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांचा BMI 30 किंवा त्याहून जास्त असतो. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त होते तेव्हा टाईप 2 मधुमेह होतो. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे ऑस्टियोआर्थराइटिसचा धोका वाढू शकतो.
टाईप 2 मधुमेह असलेल्या 10 पैकी 8 लोकांचे वजन जास्त असते. मधुमेहामुळे हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, डोळ्यांच्या समस्यांबरोबर इतर आरोग्य समस्याही होऊ शकतात.
लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर यांसारख्या समस्या उद्भवतात. मधुमेह आणि रक्तदाब नसला तरीही लठ्ठपणामुळे मूत्रपिंडाच्या आजाराला बळी पडू शकता.
शरीराच्या एकूण वजनाच्या 5 ते 10 टक्के वजन कमी करून हृदयविकाराचा धोका कमी केला जाऊ शकतो. तसेच रक्तदाब कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तप्रवाहही सुधारला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; मोदी सरकार लवकर ‘हा’ निर्णय घेणार
“तीन पक्षांचं सरकार असलं तरी…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य
तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ
स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!
किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला