सेक्स एज्युकेशन विषयी माहिती देणाऱ्या ‘या’ व्हिडीओवर अनेकांकडून आक्षेप, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात. तर त्यातील काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तसेच जगभरात बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटना घडत असतात. या घटनांना आळा बसण्यासाठी ऑस्ट्रेलिया या देशात एक मोहिम राबलण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारने यासाठी मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देण्यासाठी एक व्हिडीओ दाखवला. मात्र या व्हिडीओवर अनेकांनी टीका केली असून, अनेकांनी त्यावर आक्षेपही घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारला याप्रकरणी माघार घ्यावी लागली आहे. तसेच सरकारने हा व्हिडीओ संबंधीत अधिकृत वेबसाईटवरूनही काढून टाकला आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण मुलगी आपल्या बॉयफ्रेंडची संमती न घेता, त्याच्या तोंडावर मिल्कशेक लावते. तर दुसरी मुलगी शार्क माशासोबत पोहण्यासाठी घाबरत आहे. तर तिचा बॉयफ्रेंड तिला त्यासाठी खूप आग्रह करत आहे.

कोणाच्याही संमतीशिवाय काही करू नका, असा संदेश या व्हिडीओतून द्यायचा आहे. परंतू व्हिडीओत ज्याप्रकारे ते दखवलं गेलं आहे. हे खूप किचकट आहे. मुलांच्या ते लगेच लक्षात येणार नाही. त्यामुळे जितकं स्पष्टपणे मुलांना सांगसाल तितकं त्यांना लगेच समजेल, असं तज्ञांचं मत आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये लैंगिक शिक्षण ही मोहीम ऑनलाईन असून, यामध्ये वयोगट 14 ते 17 यामधील मुलांना शिक्षण दिलं जातं. ऑस्ट्रेलिया सरकारकडून रिस्पेक्ट मॅटर्सच्या अंतर्गत सेक्स संबंधी शिक्षण देण्यासाठी ‘The Good Society’ या वेबसाईटवर 35 व्हिडीओज, स्टोरिज आणि पॉडकास्ट अपलोड केले आहेत.

ही मोहिम चांगली जरी असली, तरी या मोहिमे अंतर्गत ज्या पद्धतीने शिक्षण दिलं जात आहे. त्यावर काही तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

‘The Good Society’ या वेबसाईटवर सेक्स संबंधीचे शिक्षण देण्यासाठी जे व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत ते व्हिडीओ उलटअर्थी भ्रम, शंका निर्माण करणारे आहेत. त्या अपलोड कलेल्या व्हिडीओजमधून जो संदेश द्यायचा आहे तो योग्यपणे न जाता, त्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचंही काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

तसेच हा व्हिडीओ ‘@MatildaBoseley’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेक वेगवेगळ्या कमेंट येत असून, हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 3 लाख लोकांनी पाहिला आहे.


महत्वाच्या बातम्या-

आजीचा पदर धरत ‘बाहेर जाऊ नकोस करोना होईल’…

चक्क चिमणीनं दाखवली घसा साफ करायची सोपी पद्धत, पाहा व्हायरल…

वडिल इरफान खान आणि अमिताभ यांचा फोटो शेअर करत बाबिलनं व्यक्त…

IPL 2021: चुरशीच्या लढतीत चेन्नईचा कोलकातावर 18 धावांनी विजय

फेस सर्जरी करणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात,…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy