Top news मनोरंजन

जगातील पहिली महिला! अवघ्या 24 व्या वर्षी इन्स्टाग्रामवर केला ‘हा’ भीमपराक्रम

kayli e1642076226521
Photo Credit- instagram/Kylie Jenner

मुंबई | लोकप्रिय हॉलिवूड मॉडेल आणि बिजनेसवूमन कायली जेनर (Kylie Jenner) नेहमी सोशल मीडियावर (Instagram) चर्चाचा विषय असते. याआधीही कायलीला तिच्या फोटो, मेकअप, ट्रान्सफॉर्मेशन अशा अनेक गोष्टींमुळे ट्रोल होत असते.

कायलीची सध्या जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये गणना केली जाते. सध्या कायली एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. किम कार्दशियनची ती धाकटी बहीण आहे.

सोशल मीडियाचा प्लॅटफाॅर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर कायलीने आता एक वेगळाच इतिहास रचला आहे. सध्या इन्स्टाग्रामवर 300 दशलक्ष म्हणजेच 30 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.

2007 ते 2021 पर्यंत किपिंग अप विथ द कार्दशियन्स ही रिअॅलिटी टेलिव्हिजन मालिका केली होती. त्याचबरोबर ती कॉस्मेटिक कंपनी काइली कॉस्मेटिक्सची संस्थापक आणि मालक आहे.

कायली जेनर सध्या इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो करणारी महिला आहे. मागील काही दिवसांपासून ती इन्सटाग्रामपासून लांब गेल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र ती पुन्हा परत आली.

फॉलोअर्सच्या बाबतीत जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे. रोनाल्डो 388 दशलक्ष फॉलोअर्ससह इन्स्टाग्रामवर सर्वाधिक अव्वल स्थानी आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गायब असलेली कायली आता ख्रिसमसच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून आली. त्यामुळे ती आता इन्सटाग्रामवर 300 मिलियन फॉलोअर्स असलेली जगातील पहिली महिला होण्याचा मान तिने मिळावला आहे.

महत्वाच्या बातम्या –

तिसऱ्या लाटेवर इंदुरीकर महाराज म्हणतात, “दोन लाटा येऊन गेल्या ओ…”

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

 श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…