इस प्यार को क्या नाम दू! भर रस्त्यात तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, पाहा व्हिडीओ

औरंगाबाद | सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. त्यामुळे अनेक लोकं प्रसिद्धीच्या झोतात येतात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (couple kissing on running bike)

व्हायरल होणारा हा व्हिडीओ औरंगाबादमधील असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओमध्ये तरुण तरुणीचे अश्लील चाळे कैद झालेले पहायला मिळत आहे.

औरंगाबाद-जालना रस्त्यावर एक तरुण आणि तरुणी चालत्या दुचाकीवर चुंबन करताना दिसत आहेत. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका चारचाकीत असणाऱ्या व्यक्तीने संबंधित घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे.

व्हिडीओमधील तरुण एका तरुणीला दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर बसवून गाडी चालवत आहे. त्यावेळी दोघं सात्त्याने किसिंग करत होते.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांना या व्हिडीओला पसंती दिली आहे तर अनेकांनी या दोन्ही प्रेमी युगलांवर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रेमी जोडप्यांनी फक्त स्वत:चीच नाही तर रस्त्यावरील इतर नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे. त्यामुळे अनेकांनी यावर संताप देखील व्यक्त केला आहे.

दरम्यान, प्रेम असावं पण अंधळं नसावं, असं म्हणतात. इतरांच्या जीव धोक्यात कितपत योग्य आहे हे?, असा सवाल आता नेटकरी उपस्थित करत आहे.

पाहा व्हिडीओ –


महत्त्वाच्या बातम्या –

घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात वेगानं वाढतोय हा ट्रेंड!

फिरायला आलेल्या तरुणीवर तीन मित्रांचा बलात्कार, अत्यंत धक्कादायक घटना

 मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!

 कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

 …म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ