खेळ

एकदिवसीय विश्वचषकानंतर आता थरार कसोटी विश्वचषकाचा! आयसीसीने केलं वेळापत्रक जाहीर

लंडन | एकदिवसीय आणि टी- ट्वेन्टी विश्वचषकानंतर आता कसोटी विश्वचषकाला सुरवात होणार आहे. यासंबंधी आयसीसी क्रिकेट बोर्डाने आज वेळापत्रक जाहीर केलं आहे. 

आयसीसी कसोटी विश्वचषक स्पर्धेला येत्या 1 तारखेपासून सुरवात होणार असून 2021 ला आंतिम मुकाबला होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत पुढील 2 वर्षात 27 मालिकांमध्ये 72 कसोटी सामने होणार आहेत.

आयसीसी कसोटी विश्वचषक स्पर्धेत क्रमवारीत असलेल्या पहिल्या 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये 9 संघांना घरच्या मैदानावर तीन तर प्रतिस्पर्धी संघाच्या देशात 3 मालिका खेळायच्या आहेत.

प्रत्येक मालिका 120 गुणांसाठी खेळली जाईल. या मालिकेत कितीही सामने असले तरी त्यातून मिळणारे गुण 120 इतकेच राहतील. तर प्रत्येक संघ 6 मालिका खेळेल. या 6 मालिकांचे एकूण 720 गुण असतील. प्रत्येक संघ सर्वाधिक 720 गुणांची कमाई करु शकतो. 

720 गुणांपैकी ज्या दोन संघांकडे जास्त गुण असतील ते संघ 2021 मध्ये अंतिम सामना खेळतील. अंतिम सामना जिंकणारा संघ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत पहिला टेस्ट वर्ल्डकप विजेतेपद पटकावेल.

 

महत्वाच्या बातम्या-

-भाजपा प्रवेश देणे आहे पण नियम व अटी लागू…; ‘पुणेरी स्टाईल पोस्टर’बाजी!

-इम्तियाज जलील यांची विजयी रॅली; संसदेत दुष्काळावर भाषण अन् रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी

नारायण राणेंचं आमंत्रण शरद पवारांनी स्विकारलं!

-‘मला पक्षात येण्यासाठी सारखं बोलावणं येतंय’; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

-बारामतीत घुमणार मुख्यमंत्री फडणवीसांचा आवाज!

IMPIMP