अरे बापरे! सलमान चक्क घोड्यासोबत खातोय चारा, व्हिडीओ व्हायरल

मुंबई | अभिनेता सलमान खान नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानने आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. व्यावसायिक आयुष्यबरोबरच सलमान त्याच्या वैयक्तीक आयुष्यामुळे देखील खूप जास्त चर्चेत असतो.

सलमान नेहमीच आयुष्य बिनधास्तपणे जगताना दिसतो. तो नेहमीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण दिलखुलासपणे जगतो. याच बिनधास्त सलमानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चाहत्यांच्या लाडका सलमान या व्हिडिओमध्ये चक्क एका घोड्यासोबत चारा खाताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या फार्म हाऊसवर असल्याचं दिसत आहे.

सलमानच्या फार्म हाऊसवर अनेक पाळीव प्राणी पाहायला मिळतात. तसेच येथे अनेक घोडे देखील आहेत. फार्म हाऊसवरील एका घोड्याला चारा घालण्यासाठी सलमान जातो. यावेळी त्याच्या हातात चारा असतो. मात्र, हा चार घोड्याला चारण्याऐवजी सलमान स्वतःच खाऊ लागतो.

यावेळी सलमान फुल मजा घेताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. घोड्याचा चारा सलमान चक्क चावून खात आहे. हे पाहून नेटकरी देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. सलमान आहे तर काहिही शक्य आहे, अशा प्रतिक्रिया सलमानचे चाहते या व्हिडीओवर देत आहेत.

सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याचे चाहते व्हिडीओला भरभरून प्रेम देत आहेत. तसेच या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे.

दरम्यान, सलमान खान सध्या ‘टायगर 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगसाठी तो रशियाला रवाना झाला आहे. या चित्रपटामध्ये देखील अभिनेत्री कतरीना कैफ सलमान बरोबर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

https://www.instagram.com/reel/CStyIBsBzaM/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

महत्वाच्या बातम्या-

विद्युत जामवालच्या डेटिंगची सर्वत्र चर्चा, करिश्मासोबत आहे खास कनेक्शन

…म्हणून माधुरी आणि भारती चालू कार्यक्रमात ढसाढसा रडल्या, पाहा व्हिडीओ

तालिबान्यांशी हिंदुत्वाची तुलना करणं स्वरा भास्करला महागात पडलं, FIR दाखल?

कंडोममध्ये सोनं घालून महिलांनी अशा जागी लपवलं की पाहून मुंबई पोलीसही चक्रावले!

संतापलेल्या ऐश्वर्याने ‘या’ कारणाने अभिषेकला दोन रात्री ठेवलेलं रुमबाहेर