बापरे!!! फक्त 5 मिनिटात चार्ज होणार; 500 किलोमीटर धावणार, पाहा किंमत!

नवी दिल्ली | देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे.  बरेच ऑटोमेकर्स इलेक्ट्रिक वाहनांवर आपलं भवितव्य आजमावत आहेत.  देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या जोरदार मागणीमुळे ऑटोमेकर्संना चांगला पैसा देखील मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी ह्युंदई कंपनी नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे.

दक्षिण कोरियाची प्रमुख वाहन निर्माती ह्युंदाई कंपनी एक इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याच्या तयारी करत आहे.  ही कार यावर्षी सध्याच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांपेक्षा उच्च ड्रायव्हिंग रेंज प्रदान करनार आहे.  ह्युंदाई मोटर ग्रुपचे चेअरमन युईसन चुंग यांनी यावर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपनीची पुढील योजना आणि कार्यनीती जाहीर केली आहे.

या प्लॅटफॉर्मवर उत्पादित कार जास्तीत जास्त ड्रायव्हिंग रेंज प्रदान करण्यास सक्षम असनार आहेत.  अहवालानुसार या प्लॅटफॉर्मची ड्रायव्हिंग रेंज जास्तीत जास्त 500 किलोमीटरपर्यंत आहे.  त्याचबरोबर या कारमध्ये कंपनी वेगवान चार्जिंग सिस्टमचा वापर करणार आहे.

hyundai kona electric

यामुळे ही इलेक्ट्रिक कार केवळ 18 मिनिटांमध्ये तिची बॅटरी 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग होवू शकणार आहे.  त्याचबरोबर, ही कार फक्त 5 मिनिटांच्या चार्जिंगवर जवळपास 100 किलोमीटर पर्यंत चालविली जाऊ शकते.  याशिवाय अधिक माहितीसाठी, ह्युंदाई या प्लॅटफॉर्मचा ग्लोबल मॉडलमध्ये वापर करणार आहे.

सध्या ह्युंदई कंपनीचे हे एकमेव इलेक्ट्रिक वाहन भारतीय बाजारामध्ये आहे.  नवीन वर्षाच्या निमित्ताने जगभरातील कंपनीच्या कर्मचार्‍यांना त्यांनी हा संदेश दिला आहे. या व्यतिरिक्त भविष्यामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे, डिसेंबर महिन्यात कंपनीने इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म सादर केला आहे.  असा दावा केला जात होता की कंपनी हा प्लॅटफॉर्म आपल्या आगामी वाहनात वापरणार आहे. जो एक डेडीकेटेड बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल प्लॅटफॉर्म आहे.

ह्युंदाई कंपनीचे हे एकमेव असे इलेक्ट्रिक वाहन आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये ह्युंदई कंपनीने 39.2 किलो वॅट क्षमतेची बॅटरी वापरली आहे.  सिंगल चार्जमध्ये 452 कि.मी. पर्यंत ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते.  त्याचबरोबर या कारची किंमत 23.75 लाख ते 23.94 लाख रुपये इतकी असू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-