अरे बापरे! बाळाला जन्म देईपर्यंत महिलेला माहितीच नव्हतं ती प्रेग्नेंट आहे

नवी दिल्ली| गर्भधारणेची लक्षणं आहेत; मळमळणं, उलट्या होणे, जड वाटणे, चक्कर येणे. गर्भवती झाल्यानंतर पोट वाढू लागतं. अश्या प्रकारची लक्षणं दिसू लागल्यानंतर एखादी महिला बाळाला जन्म देते. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाळाचा जन्म होईपर्यंत महिलेला माहितीच नव्हतं की ती प्रेग्नेंट आहे.

एका महिलेला मात्र ती प्रेग्नंट आहे हे माहितीच नव्हतं आणि तिने अचानकपणे बाळाला जन्म दिला आहे, तेसुद्धा आकाशात.

आश्चर्य म्हणजे ज्या महिलेनं बाळाला जन्म दिला तिच्यासाठीच हा मोठा धक्का होता. कारण आपण प्रेग्नंट आहोत याची माहिती तिलाच नव्हती. विमानात एका महिलेची डिलीव्हरी झाली. हे विमान सॉल्ट लेक सिटूहून होनोलुलूला जात होतं. त्यावेळी विमानातच बाळाचा जन्म झाला आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार लेविनिया मोंगा नावाची ही महिला आहे, जिनं बाळाला जन्म दिला आहे. तिचं बाळ वेळेआधीच जन्माला आलं आहे. 26 ते 27 आठवड्यांचं हे बाळ आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

कोरोना काळात आई-वडिलांना गमावलेल्या मुलांसाठी धावून आली…

‘या’ अष्टपैलू खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून…

IPL 2021: टीममधून काढल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला अश्रू अनावर,…

…..म्हणून मला माझा गोरा रंग आवडत नाही, कंगना रणौत…

कोरोना लढ्यात आता विराट-अनुष्काचा पुढाकार, व्हिडीओ शेअर करत…