अरे वाह! या’ स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कुटर विषयी तुम्हाला माहीत आहे का? नक्की वाचा

नवी दिल्ली | देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. बरेच ऑटोमेकर्स इलेक्ट्रिक वाहनांवर आपलं भवितव्य आजमावत आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या जोरदार मागणीमुळे ऑटोमेकर्संना देखील चांगलाच फायदा होत आहे.

अलिकडे अनेक हटके इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येत आहेत. इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक देखील इलेक्ट्रिक गाड्यांनाच पसंती दर्शवत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वाहन कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या सादर केल्या आहेत.

अशातच आता बर्ड ग्रुपची सहायक कंपनी असणारी बर्ड मोबिलिटी इलेक्ट्रिक देखील आपल्या नवीन गाड्या बाजारात उतरवत आहे. बर्ड मोबिलिटी इलेक्ट्रिक आता आपली Bird ES1 बाजारात आणण्याच्या तयारीत दिसत आहे. माहितीनुसार, या वर्षाच्या मध्याला ही स्कुटर भारतीय शोरूममध्ये दिसेल.

ही स्कुटर सुरुवातीला दिल्लीमध्ये लाँच केली जाईल, असं बोललं जात आहे. दिल्लीनंतर देशातील इतर मुख्य शहरात ही स्कुटर नजरेस पडेल. ही एक सर्वात स्वस्त आणि मस्त स्कुटर असेल. याची किंमत केवळ 50 हजार रुपयांच्या आसपास असेल, असं बोललं जात आहे.

या स्कुटरमध्ये अनेक वेगवेगळे आणि हटके फिचर्स देण्यात आले आहेत. याच डिझाईन देखील हटके आहे. Bird ES1 चा लूक पाहून बाईकप्रेमी घायाळ होत आहेत.

Bird ES1 मध्ये LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच शार्प डिझाईन अससेसा LED टेललॅम्प आणि स्लीप्ट सीट देखील देण्यात आलं आहे. सोबतंच या बाईकचं इंजिन देखील उत्तम आहे.

तसेच या हटके स्कुटरमध्ये 3 AH क्षमतेची लिथिअम आयन बॅटरी दिली गेली आहे. सिंगल चार्जवर ही स्कुटर जवळपास 55 किलोमीटर पर्यंत धावू शकते. या स्कुटरचं टॉप स्पीड 45 किमी प्रती तास आहे.

दरम्यान, सध्या जरी या गाडीची लाँचिंग तारीख फिक्स झाली नसली तरी देखील भारतीय बाईकप्रेमी याची आतुरतेने वाट पाहत आहेत. Bird ES1 भारतीय रस्त्यांवर केव्हा धावणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मध्य प्रदेश पोलिसांची गुं.डागिरी! रिक्षा चालकाला भर चौकात मारला; व्हिडीओ व्हायरल

पुढील चार दिवस ‘या’ भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा, वाचा सविस्तर

‘मिसेस श्रीलंका’च्या मंचावर राडा! विजेतीचा मुकूट…

‘वय विचारू नका, थोडी लाज वाटते’ म्हणत…

लग्नात नवरी निघाली नवदेवाची हरवलेली बहीण, पाहा नेमकं काय…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy