काय सांगता भेंडी एवढी लाभदायी आहे! सविस्तर वाचा

भेंडीची भाजी तर अनेकांना आवडते. क्वचितच कोणीतरी असेल ज्याला भेंडीची भाजी आवडत नसेल. लहानपणापसून आपण खात आलेल्या या भेंडीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? आज जाणून घेवूयात बहुगुणी भेंडी खाण्याचे फायदे.

भेंडीमध्ये विटामिन ए, विटामिन सी, कॅल्शियम तसेच प्लोएट उपलब्ध असतात. हे सर्व घटक त्वचेसाठी अत्यंत लाभदायी असतात. यामुळे भेंडीचे सेवन केल्यास त्वचा टवटवीत राहतो. तसेच भेंडीचा फेसपॅक तयार करून आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावावा. थोड्या दिवसातच तुम्हाला अविश्वसनीय बदल जाणवेल.  तसेच भेंडी खाल्ल्याने चेहऱ्यावर असणारे पिंपल्स किंवा पुरळ देखील कमी होतात .

बऱ्याच लोकांना मळमळ, पोटदुखी, आणि जास्त गॅससारख्या समस्या असतात. या लोकांनी आवर्जून जेवणामध्ये भेंडीचा समावेश करावा. भेंडीच्या सेवनाने हे सर्व विकार दूर होतात. भेंडीच्या सेवनाने डोळ्यांची रोशणाई  देखील वाढते. भेंडीमुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहते. तसेच भेंडीमुळे हृदय देखील स्वस्थ आणि निरोगी राहते.

भेंडीमध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. भेंडीमध्ये असणारे विटामिन ए, विटामिन सी, पायराइडॉक्साइन, सोडियम, सेलेनियम आणि थायमिन पायराइडॉक्साइन हे पोटॅशियम स्टोअर आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या संपत्तीचा वारस कोण? सुशांतच्या वडिलांचा मोठा निर्णय

राष्ट्रवादीवर पसरली शोककळा! ‘या’ दोन बड्या नेत्यांच एकाच दिवशी निधन

रिया आणि महेश भट्ट यांच व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानं सुशांत प्रकरणाला नवं वळण

बॉलीवुडमधील ही प्रसिध्द अभिनेत्री होती सुशांतची तिसरी गर्लफ्रेंड; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक खुलासा!