होम क्‍वारंटाइन रुग्णांवर मुंबई पालिका प्रशासनाचं असणार लक्ष, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई

मुबंई |  दिवसेंदिवस कोरोनाचं प्रमााण वाढत चाललं आहे. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता मुंबई पालिकेने काही सूचना जाहीर केल्या आहेत. पालिकेने उचललेल्या कठोर पावलांमुळे मुंबईत करोनाची साथ नियंत्रणात येऊ शकली. असे असताना परत मुंबईतील स्थिती बिघडू नये म्हणून पालिकेने वेळीच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

सांताक्रुझ येथील हॉटेलमधून चार प्रवाशांनी पलायन केल्याची घटना समोर आली आहे. सांताक्रूझच्या एका हॉटेलमधून क्वारंटाईन केलेले काही प्रवासी पळून गेल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत आता कठोर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अशातच आता होम क्वारंटाईन केलेल्या रुग्नांच्या हातावर पून्हा शिक्का मारण्यात येणार आहे.

कोरोनाची लक्षणं नसलेल्या किंवा होम क्वारंटाईन केलेल्या रुग्नांना दिवसातून पाच ते सहा वेळा फोन करून ते घरी असल्‍याची खातरजमा केली जाणार आहे. यातच जर त्यांनी नियम मोडला तर त्यांंच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनानं दिला आहे.

बाधितांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे किंवा त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे. विना मास्क फिरणाऱ्यांनाही दणका दिला जाणार असून मंगल कार्यालये, क्लब, उपहारगृहे या ठिकाणी धाडी टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

वाढती रुग्णसंख्या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारावेत, त्यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. लग्न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्यवस्थापनांवरही गुन्हे दाखल करावेत. मास्कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये 300 मार्शल्स‍ नेमावेत तसेच मुंबईतील मार्शल्सची संख्या दुप्पट करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळणाऱ्या इमारती प्रतिबंधित कराव्यात, यासह विविध सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त चहल यांनी दिल्या आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने हे पाऊल उचलल्याचं पहायला मिळत आहे. पालिकेचे नियम मोडून घराबाहेर पडलेल्या बाधित रुग्णांबाबत तक्रार आल्यास विभाग स्तरावरील वॉर रुममार्फत अशा रुग्‍णांवर गुन्‍हे दाखल केले जाणार आहेत.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्नांच्या संख्ये वाढ पहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून काही मोठे निर्णय घेतले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला देखील माहित हवेत ‘हे’ नियम; नक्की जाणून घ्या

संपूर्ण रेल्वे तिच्यावरुन धडधडत गेली अन् मग…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!

निषेधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाठवली 150 कंडोमची पाकिटं; वाचा काय आहे प्रकार

पूजाच्या वडिलांचा नवा गौप्य.स्फोट, भाजपचं घेतलं नाव!

ऐकावं तेवढं नवलचं! चाहत्यानं उभारला चक्क ‘या’ अभिनेत्रीचा पुतळा