डाॅ. रवी गोडसे म्हणतात, “Omicron म्हणजे Nonsense”

मुंबई | अवघ्या जगात सध्या ओमिक्राॅन या एकाच नावाची चर्चा आहे. कोरोनाने गेली दीड वर्षाहून अधिक काळ जगात धुमाकुळ घातला होता. त्यात आता ओमिक्राॅननं अधिक ताण सहन करावा लागत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून भारताला सुचना आणि माहिती पोहचवणारे प्रसिद्ध डाॅक्टर रवि गोडसे यांची खास ओळख आहे. आपल्या ट्विटच्या माध्यामातून गोडसे सतत कार्यरत असतात.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान गोडसे यांनी भारतीय नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे संदेश दिले होते. परिणामी गोडसे यांच्या ट्विटची भारतात फार चर्चा होते.

काही दिवसांपूर्वी गोडसे यांनी ओमिक्राॅनमुळं काही होणार नाही. तिसरी लाट येणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यावर अनेक तज्ज्ञांनी टीका केली होती.

गोडसे यांनी आता ओमिक्राॅन म्हणजे नाॅनसेंन्स आहे, अशा प्रकारचं ट्विट केलं आहे. परिणामी त्यांन हे ट्विट कशामुळं केलं असेल याची चर्चा होत आहे. सध्या गोडसे यांचं हे ट्विट सर्वाच्या चर्चेचा विषय बनलं आहे.

ओमिक्राॅन म्हणजे शक्तिहीन व्हायरस आहे. ओमिक्राॅन इतक्या झपाट्यानं पसरतोय पण नागरिकांच्या जीवाला धोका नसल्याचं स्पष्टीकरण गोडसे यांनी दिलं आहे.

कोरोनाच्या आधिच्या व्हेरियंटना गोडसे यांनी गंभीरतेनं घेतलं होतं. पण ओमिक्राॅनला गोडसे खूप हलक्यात घेत आहेत. परिणामी त्यांच्यावर टीका देखील झाली आहे. त्यांनी लसीकरणावर आपलं मत माडलं आहे.

18 वर्षाखालील मुलांना लस नाही दिली तर आपलं नुकसान होवू शकतं. परिणामी लहान मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज गोडसे यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, सध्या ओमिक्राॅनचा धोका वाढत असताना गोडसे यांच्या ओमिक्राॅनबाबच्या वक्तव्यांना तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. भारत सरकारनं नुकतीच लहान मुलांच्या लसीकरणास सुरूवात करण्याची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी

लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं