धक्कादायक! मुंबईतील 55 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यात आढळला ओमिक्रॉन

मुंबई | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. अनेक देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.

भारतातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यानंतर सर्वात जास्त ओमिक्रॉनबाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

राज्यात कोरोनाचा सर्वाधिक झपाट्याने प्रसार मुंबईत होत आहे. राज्यातील एकुण कोरोना रूग्णसंख्येपैकी 63 टक्के रूग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत.

एकीकडे मुंबईत कोरोनाचा वेगाने फैलाव होत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत आढळून आलेल्या 55 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यात ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आला आहे.

काही दिवसांपूर्वी फक्त 2 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यात ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. पंधरा दिवसातच ओमिक्रॉन व्हेरिएंटचा मुंबईत वेगाने फैलाव झाला आहे.

राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार वाढत असला तरी फक्त 6 टक्के लोकांना रूग्णालयात दाखल करण्याची गजर पडली. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.

राज्यात चार नवे ओमिक्रॉनबाधित रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील एकुण ओमिक्रॉन व्हेरिएंट केसेसची संख्या 454 वर जाऊन पोहोचली आहे.

मुंबईतून गोळा करण्यात आलेल्या 282 कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यांपैकी 55 टक्के नमुन्यात ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आला आहे. तर 32 टक्के केसेस या डेल्टा डेरिव्हेटिवच्या आहेत आणि उर्वरीत 13 टक्के नमुन्यात डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मुंबईत कोरोना नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. मुंबईत 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘…तर कठोर निर्णय घ्यावा लागेल’; अजित पवारांनी दिले मोठे संकेत

‘कोरोनाच्या आणखी अनेक लाटा येतील, कारण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

सावधान! Omicron रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवीन लक्षणं, दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा

“आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय”

धक्कादायक! आता आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण