सावधान! Omicron ची लागण झालेल्या रूग्णांमध्ये दिसतायेत ‘ही’ गंभीर लक्षणं

नवी दिल्ली | देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या Omicron व्हेरिएंटने सर्वांचीच चिंता वाढवली आहे.

देशातील 14 पेक्षा जास्त राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. देशात सापडत असलेल्या ओमिक्रॉनबाधित रूग्णांमध्ये गंभीर लक्षणं आढळून आले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंट सर्वाधिक वेगाने पसरणारा विषाणू मानला जात आहे. या व्हेरिएंटमुळे एका दिवसात हजारोंच्या पटीने रूग्णसंख्या वाढत आहे.

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एम्सकडून ओमिक्रॉनबाधितांमध्ये आढळलेली पाच मुख्य लक्षणं सांगण्यात आली आहेत.

श्वास घेण्यास त्रास होणं, ऑक्सिजन पातळीत लक्षणीय घट, छातीत सतत वेदना होणं किंवा छाती दडपल्यासारखं जाणवणं, मानसिकदृष्ट्या गोंधळाची स्थिती निर्माण होणं, कोणताही प्रतिसाद न देणं, ही ओमिक्रॉनची गंभीर लक्षणं आहेत.

सलग 3 ते 4 दिवस ही गंभीर लक्षणं आढळून आली किंवा त्यात वाढ होत असल्याचं लक्षात आलं तर तात्काळ डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे, अशी माहिती एम्सच्या वतीने देण्यात आली आहे.

घशात खवखव, डोकेदुखी, हलका ताप किंवा अंगदुखी ही देखील ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं आहेत. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अॅनालिसिसनुसार खोकला, थकवा, कफ, सतत नाक वाहणे ही ओमिक्रॉनची प्रमुख चार लक्षणं आहेत.

यापैकी ओमिक्रॉनचे केणतेही लक्षणं आढळले तर तात्काळ कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. तर तज्ज्ञांच्या मते, संसर्ग होणं आणि त्याची लक्षणं दिसणं याचा कालावधी देखील बदलू शकतो.

लक्षणं दिसली म्हणून लगेच कोरोना चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आला तर संसर्ग झाला नाही या भ्रमात राहणं चुकीचं आहे. काही दिवसांनी पुन्हा तपासणी करून घेणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण -एकनाथ खडसे

Corona | कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर ‘या’ गोष्टी सर्वात आधी करा

आपल्याला लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही- उद्धव ठाकरे

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता इतक्या जणांच्या उपस्थितीत उरकावं लागणार लग्न

पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज