मुंबई | मागील 15 दिवसांपासून देशात कोरोना (Corona) रूग्णसंख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर ओमिक्राॅनने (Omicron Symptoms) देखील देशाला विळखा घातल्याचं दिसतंय.
अशातच आता लहान मुलांना देखील ओमिक्राॅनची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यातच आता लहान मुलांमध्ये सापडणारी ओमिक्राॅनची लक्षणं समोर आली आहेत.
आजकाल आपण कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये ताप, घसा खवखवणे आणि खोकला यासारखी लक्षणं दिसून येत आहे. तर तरुण आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत.
तरुण आणि लहान मुलांमध्ये यापैकी बहुतेक लोकांमध्ये ओमिक्राॅनची अतिशय सौम्य लक्षणे आहेत. ताप, खोकला, घसा खवखवणे आणि घसा दुखणे यांसारखी लक्षणे मुलांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत.
संसर्ग झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज विकसित होतात, ज्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. मुलांना संसर्ग होण्याचा सतत धोका असतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
आतापर्यंत मुलांमध्ये इम्युनिटी जास्त असल्यानं कोरोनाचा प्रभाव खूपच कमी असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना हा शरीरातील श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. त्यामुळे वृद्धांवर याचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लसीकरण करून घेणं ही देखील आपली जबाबदारी आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगानं पसरतोय. मात्र, ओमिक्रॉन झालेल्या रूग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणांचं ओझं देखील हलकं झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चिंताजनक! फक्त 2 दिवसात नव्या रूग्णसंख्येत दुप्पटीने वाढ; वाचा आकडेवारी
“नाना मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला”, चंद्रकांत पाटलांचा सज्जड दम
मोदींचा ताफा अडवला अन् ‘फुलराणी’ भडकली, म्हणाली…
पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक, पंजाबमधील रॅली रद्द; भाजप नेत्यांची आक्रमक भूमिका
चारचौघांमध्ये राडा!, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भांडणाचा दुसरा व्हिडीओ व्हायरल