मोदींमुळे मी निवडून आलोय; शिवसेनेच्या ‘या’ खासदाराची कबूली

नवी दिल्ली | शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच संददेतलं भाषण सध्या चांगलंचं व्हायरल होतयं. भाषणादरम्यान लोकसभा अध्यक्षांनी भाषण आवरतं घ्यायला सांगितल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन मला निवडून दिलंय त्यामुळे मला बोलू द्या, असं ओमराजे म्हणाले.

उस्मानाबादच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी पाण्यापासून वंचित आहेत त्या भागांना न्याय देण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करू असं आश्वासन दिल होतं. आणि त्यांनी ते पुर्ण केलंय. त्यांच्याकडून मराठवाड्याला भरपूर अपेक्षा आहेत, असं ओमराजेंनी म्हटलं आहे. 

मोदींनी आश्वासन दिलंय, ते नक्की पुर्ण करतील, असंही ते म्हणाले. मराठवाड्याच्या दुष्काळावर पोटतिडकीनं बोलताना बोलताना त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं. 

काँग्रेस- राष्ट्रवादीने मराठवाड्यावर कायम अन्याय केला आहे. आघाडी सरकारनं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी दिलं नाही. आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्या, अशी मागणी ओमराजेंनी लोकसभेत केली.