‘मातोश्री काय…’; हनुमान चालिसेवरून राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला झापलं

पुणे | मनसेच्या पुण्याल्या सभेत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्श केलं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यांवर देखील टीका केली.

मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवा ही मागणी आम्ही केल्यानंतर ते राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायचा हट्ट केला. अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?, असा सवाल करत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला चांगलंच सुनावलं आहे.

मधू इथे आणि चंद्र तिथे, असं झालं. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. शिवसैनिक आक्रमक झाले. लडाखमध्ये संजय राऊत आणि राणा दाम्पत्य जेवतानाचे फोटो समोर आली. यांचं हिंदुत्त्व ढोंगी आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली, असंही ते म्हणालेत.

एक कुणीतरी तिकडचा खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत, असंही ते म्हणालेत.

मला सगळं सांगणं शक्य नाही.. दौरा रद्द झाल्याने अनेक जण माझ्यावर टीका करतायत… मी शिव्या खायला तयार आहे.. पण माझ्या मनसेच्या पोरांवर मी केसेस होऊ देणार नाहीत. कुणाच्याही षडयंत्राला मी बली पडणार नाही, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी टीका सहन करेन पण माझ्या पोरांना अडकू देणार नाही” 

“खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी….” 

राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंचा खळबळजनक दावा, म्हणाले… 

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का?- शरद पवार 

SBI बँकेत अकाऊंट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘हा’ मेसेज आला असेल तर…