Top news महाराष्ट्र मुंबई

योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

मुंबई | जनतेचा आशीर्वाद वाया जात नाही. योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

आमच्याकडे स्वबळावर सत्तेत येण्याएवढी ताकद होती. आम्ही स्वबळावर लढलो असतो तर आम्ही 144 चा आकडा गाठला असता, असंही ते म्हणाले. तर झालं ते झालं पण इथून पुढे योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेल, असं ते म्हणाले.

आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांसाठी खुप काही केलं. निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराला आम्ही गेलो. पण भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून कधीही कोणी आलं नाही. मात्र नंतर आमच्या नाकाखाली काय सुरू होतं हे आम्हाला समजलं. निवडणुकीआधीच शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ठरलं होतं, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणूक घेण्याला परवानगी दिल्यानंतर जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. फडणवीसांचं परत येण्याचा बेत सध्या तरी हुकला आहे, असं ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

-“त्या फॉर्ममुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत, सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावं”

-आम्ही स्वबळावर लढलो असतो तरी आम्ही 144 चा आकडा गाठला असता- देवेंद्र फडणवीस

-कोरोनाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले; 24 तासात वाढले ‘एवढे’ रुग्ण

-निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी, शिवसेनेचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस

-ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय