मुंबईकरांनो सावधान! मुंबईत पावसाचा तडाखा, प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर राज्यावर अखेर वरूण राजा प्रसन्न झाला आहे.

सुरूवातीच्या काही मुसळधार पावसातच मुंबईतील काही भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत पाऊस थांबायचं नाव घेत नसल्याने प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पडत्या पावसात देखील अनेक नागरिक समुद्रकिनाऱ्यावर फिरताना व समुद्रात पोहताना आढळून आले आहेत. तसेच यंदाच्या मान्सूनमध्ये तब्बल 10 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुबंईत पावसाची एकंदर परिस्थिती बघता कोणीही समुद्रकिनाऱ्यावर फिरू नये, अशा सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तर रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईकरांना ठराविक वेळेतच समुद्रकिनाऱ्यावर जाता येणार आहे.

मुंबईत रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केला असेल तर त्यादिवशी सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने यासंबंधित एक नोटीफिकेशन देखील जारी केलं आहे.

दरम्यान, मुंबईत पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चेत आलेल्या ‘या’ व्यक्तिला जीवे मारण्याची धमकी

‘सौ दाऊद एक राऊत’, मनसेची संजय राऊतांवर खोचक टीका

शिवसेनेला आणखी एक धक्का! ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईत देखील खिंडार

… अन् देवेंद्र फडणवीसांनी हात धरून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ

नासकी भाजी म्हणत गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले…