Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

दिवाळीत सुशांतच्या चाहतीने केलेल्या ‘या’ गोष्टीमुळे सोशल मीडियावर झालं भरघोस कौतुक

sushant e1602831171360

मुंबई| दिवाळी हा सण सर्वत्र खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीतील हा खूप मोठा सण आहे. या सणाला प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत असतात. बॉलीवूड इंडस्ट्रीतील कलाकार सुद्धा आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून या सणाच्या शुभेच्छा देत असतात.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत देखील सणांला आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरुन शुभेच्छा देत होता.  मात्र, या दिवाळीला सुशांतचे चाहते त्याला मिस करत आहेत.

पाच महिन्यापूर्वी झालेलं सुशांत मृ.त्यु प्रकरण अद्याप देखील चर्चेत आहे. एकीकडे या प्रकरणाला पाच महिने होऊन गेले तरी सिबीआय, एनसीबी, ईडी या एजन्सी या प्रकरणाचा तपास लावण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे सूशांतचे चाहते त्याची खूप आठवन काढत आहेत.

सुशांतच्या एका लेडीज फॅनचा सोशल मीडियावर सध्या फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ही लेडीज शुक्रवारी मुंबईत सुशांतच्या बंगल्या बाहेर दिवा घेऊन उभी होती. तीने सुशांतच्या स्मरणार्थ हा दिवा पेटवला होता. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ती हिने या महिला फॅनचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

तीने महिलेचा फोटो शेअर करत असं लिहिलं आहे की, हो आम्हाला या व्यवस्थेवर ठाम विश्वास आहे आणि आम्ही न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहू.

सुशांतची बहिण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. याशिवाय ‘एसएसआर वॉरियर्स’ असा हॅशटॅग सोशल मीडियावर वापरून ती सुशांतला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.  सुशांतचे चाहते देखील हाच हॅशटॅग वापरून सुशांतसाठी सतत न्यायाची मागणी करत आहेत.

दरम्यान, सूशांतचा मृ.तदेह १४ जुनला त्याच्या राहत्या घरी मुंबईत सापडला होता. यानंतर सीबीआयने सुशांतने आ.त्म.हत्या केल्याचं स्पष्ट केलं होतं. पण त्याचा चाहता वर्ग आणि कुटुबाबतील लोक त्याची ह.त्या झाली असं मत व्यक्त करत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे आणि सीबीआयचा तपास आता शेवटच्या टप्यात आहे.

सुशांत प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयला अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं एनसीबी याप्रकरणी तपास करत आहे. ड्र.ग्ज प्रकरणामुळे अनेक बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेते अडचनीत आले आहेत. एनसीबीनं अनेक बाॅलिवुड स्टार्सची कसुन चौकशी केली आहे. तर काही स्टार्सवर एनसीबीने धडक कारवाई पण केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कतरिनाचे ‘हे’ फोटो तुम्हाला करतील घायाळ! वाचा कतरिना कुठे करतेय हे फोटोशूट?

हिंदू दिवाळी सण का साजरी करतात? सविस्तर वाचा 3000 वर्षांपूर्वी आर्यकाळात काय घडलं होतं?

धक्कादायक! आमदार रवी राणांचा जेलमध्ये अन्नत्याग तर खासदार नवनीत राणांचं जेलबाहेर धरणं आंदोलन

सलमान म्हणतोय मला जुहीशी लग्न करायचं होतं, मी तिच्या वडीलांशीही बोललो होतो पण…

सुशांत प्रकरणी नितेश राणेंचा धक्कादायक गौप्यस्फोट! तपास करणाऱ्या पोलिसांना विचारले ‘हे’ सवाल