गुड न्यूज! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली | नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (New Year 2022) कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.

19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर कमी करण्याचा निर्णय कंपन्यांकडून घेण्यात आला आहे. इंडियन ऑइलने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकांना मोठी भेट दिली आहे.

इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत त्यावेळी कोणताही बदल झालेला नाही ही जनतेसाठी दिलासादायक बाब होती. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात (Commercial LPG Cylinder Rates) कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळाला आहे.

यावेळीही घरगुती सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती गेल्या ऑक्टोबरमध्ये वाढवण्यात आल्या होत्या.

दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. त्याचवेळी, कोलकातामध्ये त्याची किंमत 926 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 915.50 रुपयांना मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! मुंबईतील 55 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यात आढळला ओमिक्रॉन 

‘…तर कठोर निर्णय घ्यावा लागेल’; अजित पवारांनी दिले मोठे संकेत

‘कोरोनाच्या आणखी अनेक लाटा येतील, कारण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

सावधान! Omicron रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवीन लक्षणं, दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा

“आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय”