मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आषाढी एकादशीनिमित्त मोठी घोषणा केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने एसटी महामंडळ पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष गाड्यांची सोय करतं. त्यानुसार यंदाही वारकऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.
यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त 4 हजार 700 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. 6 जुलै ते 14 जुलै या कालावधीत या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथून आषाढी एकादशीनिमित्त विशेष बसेसचं नियोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनी या बसेसचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील अनिल परब यांनी केलं आहे.
वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी देखील विशेष बसचं नियोजन करण्यात आलं आहे. या रिंगण सोहळ्यासाठी 8 जुलै रोजी 200 बसेस सोडण्यात येणार आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे आषाढी एकादशी घरी बसून साजरी करावी लागली. मात्र, यंदा भाविकांना प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन माऊलीचं दर्शन घेता येणार आहे.
दरम्यान, दोन वर्षांनी पंढरीला जाऊन भाविकांना आषाढी साजरी करता येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरला नेण्यासाठी महामंडळाने तब्बल 4 हजार 700 विशेष गाड्यांची सोय केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“शतरंज का बादशाह म्हणजे देवेंद्र फडणवीस”
‘हे योग्य नाही’; दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं
‘राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत वाढ पण…’; राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ कार चालवतात, हे सरकार तर भगवान चालवतो”