Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

दसऱ्याच्या मुहूर्तावर दिशा बोलली आणि ‘ती’ चर्चा पुन्हा एकदा रंगली!

मुंबई | बॉलीवूड आणि राजकारणाचा तर पहिल्यापासूनच संबंध लावला जातो. अनेकवेळा बॉलीवूड अभिनेत्री आणि राजकीय नेते यांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर चर्चा चालू असतात. यादरम्यान अनेकवेळा सोशल मीडियावर अफवा देखील पसरवल्या जात असतात.

अभिनेत्री दिशा पटानी आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं नाव काही दिवसांपूर्वी सतत चर्चेत होतं. या दोघांच्या नात्याविषयी सोशल मिडीयावर अनेकवेळा बोललं गेलं होतं. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीच्या नात्याविषयी बोललं जावू लागलं आहे. यामागील कारणही तसंच काहीसं आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काल संपूर्ण देशात दसरा साध्या पद्धतीने साजरा केला गेला. अनेकांनी आपल्या घरी राहूनच सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये दिशा पटानीनं दिलेल्या शुभेच्छांमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

दिशा पटानीनं ट्वीटरवरुन सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिशानं शेअर केलेल्या फोटोमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.  याच फोटोमुळे दिशा आणि आदित्य ठाकरे यांच्या नात्याविषयी पुन्हा एकदा बोललं जावू लागलं आहे.

दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिशानं धनुष्यबाणाचं चित्र वापरलं आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह असल्यानं सोशल मीडियावर आदित्य ठाकरे आणि दिशाच्या नात्याविषयी चर्चा रंगल्या आहेत. एवढंच नव्हे तर दिशानं शेअर केलेल्या धनुष्यबाणाच्या पाठीमागे भगवा रंग असल्यानं या चर्चांला जास्तच उधाण आलं आहे.

दरम्यान, दिशा पटानी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी एकमेकांना डेट करत होते, अशा देखील चर्चा चालू होत्या. या दोघांचे सोशल मीडियावर अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. मात्र, दिशानं दसऱ्याच्या मुहूर्तावर दिलेल्या शुभेच्छांमधून तिला वेगळा काही इशारा तर द्यायचा नाही ना?, असा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांना पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला आणखी मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेचा झेंडा हाती घेणार?

आनंदाची बातमी : सर्व भारतीयांना आता मोफत मिळणार कोरोनाची लस!

कंगना पुन्हा बरळली! ‘त्या’ प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर अप्रत्यक्षपणे आरोप करत म्हणाली…

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या गायकाचं नि.धन, मोदींनीही शोक व्यक्त केला

मिर्झापूरचा दुसरा सिझन सापडला वादात; ‘या’ कारणामुळे बंदी येण्याची शक्यता!